कन्फर्म ! अश्विनी अय्यर तिवारीच्या चित्रपटात दिसणार आलिया भट्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 5:05 AM
आलिया भट्टचे नाव बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे. लहान वयात आलियाने तिच्या फॅन्सच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली ...
आलिया भट्टचे नाव बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे. लहान वयात आलियाने तिच्या फॅन्सच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. एकामागोमाग एक अनेक हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले आहे. सध्या ही आलियाचे शेड्यूल व्यस्त आहे. जोया अख्तरच्या गली बॉय, अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र अभिषेक शर्माच्या शिद्दत मध्ये ती दिसणार आहे. याच्याबरोबर आलिया सडकच्या सीक्वलमध्ये ही दिसण्याची शक्यता आहे. याच्याशिवाय काही दिवसांपूर्वी अशी ही बातमी आली होती की आलियाला अश्विनी अय्यर तिवारीने तिच्या आगामी चित्रपटासाठी अप्रोच केले होते. डीएनएच्या रिपोर्टनुसार आलियाने हा चित्रपट करण्यासाठी आपला होकार देखील दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट स्त्री केंद्रीत असणार आहे. हा चित्रपट संवेदनशील असणार आहे. चित्रपटाची कथा पंजाबच्या धरतीवर आधारित आहे. चित्रपट कथा एका मुलीची स्वप्न आणि तिच्या आई-वडिलांशी तिच्याशी असलेल्या नातेसंबंधा भवती फिरणारी आहे. आलिया लवकरच राजी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन प्रोड्यूस करतो आहे. यात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. ‘राजी’मध्ये आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाºयाशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाºयांना देते, असे याचे कथानक आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे. राजीनंतर तिने गली बॉयच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. यात रणवीर सिंगसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. गली बॉयमधून पहिल्यांदा दोघे एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. ‘गली बॉय’मध्ये एका स्ट्रिट रॅपरची कथा असल्याचे कळतेय. जी एका रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेली आहे. ही कथा गेल्या अनेक वर्षांपासून जोयाच्या डोक्यात होत्या. या चित्रपटासाठी आधी रणबीर कपूरचे नाव चर्चेत होते. यानंतर वरूण धवनच्या नावाचीही चर्चा झाली आणि सरतेशेवटी रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ALSO READ : आलिया भट्टची ही बहिण प्रसिद्धीपासून कोसो दूर,वयाच्या तेराव्या वर्षीच गेली होती डिप्रेशनमध्ये