Join us

Confirm : ‘बाहुबली’ प्रभास उद्योगपतीच्या नातीसोबत करणार नाही विवाह; आता अनुष्का शेट्टीबरोबर करणार काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2017 4:20 PM

‘बाहुबली’ प्रभास लवकरच एका उद्योगपतीच्या नातीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची एक बातमी सकाळपासूनच माध्यमांमध्ये चर्चिली जात आहे. परंतु, आता आलेल्या ...

‘बाहुबली’ प्रभास लवकरच एका उद्योगपतीच्या नातीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची एक बातमी सकाळपासूनच माध्यमांमध्ये चर्चिली जात आहे. परंतु, आता आलेल्या माहितीनुसार प्रभास विवाहबंधनात अडकणार नसून, ‘बाहुबली’मधील देवसेना अर्थात अभिनेत्री अनुष्का शेट्टीबरोबरच एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. ‘बाहुबली’मधून मिळालेल्या अफाट यशानंतर प्रभास सध्या अमेरिकेत सुट्या एन्जॉय करीत आहे. मात्र तो कुठे आहे, कशा पद्धतीने सुट्या एन्जॉय करीत आहे. याबाबतचा कोणालाच थांगपत्ता नसून अद्यापपर्यंत त्याचा व्हेकेशनचा एकही फोटो समोर आलेला नाही. परंतु तो ५ जून रोजी भारतात परतणार असून, लवकरच तो विवाहबंधनात अडकणार आहे. ‘बाहुबली’च्या शूटिंगमुळे तब्बल सहा हजार विवाहाचे प्रस्ताव नाकारणारा प्रभास आता बोहल्यावर चढण्यास उत्सुक आहे. त्यातच सकाळपासून त्याच्या लग्नाबाबतची एक बातमी समोर येत असल्याने तो लग्न करणार की नाही? याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सकाळी समोर आलेल्या वृत्तानुसार प्रभास प्रसिद्ध उद्योगपती भूपती राजू यांच्या नातीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. भूपती राजू यांची फॅमिली प्रभासच्या फॅमिलीच्या संपर्कात असून, लवकरच त्यांचा विवाह होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भूपती राजू रासी सीमेंट्सचे अध्यक्ष असून, उद्योग क्षेत्रात त्यांचा मोठा लौकिक आहे. मात्र बॉलिवूड लाइफ डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, प्रभास सध्या लग्न न करण्याचा विचार करीत आहे. सध्या प्रभासच्या ‘साहो’ या चित्रपटावर काम सुरू करण्यात आले असून, चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले आहे. त्यामुळे प्रभास जसा भारतात परतेल तसा लगेचच त्याच्या ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे लगेचच लग्नाचा विचार करण्याची त्याची मानसिकता नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. मजेशीर बाब म्हणजे प्रभास ‘साहो’ या चित्रपटात त्याची सर्वांत क्लोज मैत्रीण अनुष्का शेट्टी हिलाही साइन करण्यात आले आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार असून, त्यांच्या मनात दोघांप्रती प्रेमभावना निर्माण करण्याची शक्यता आहे. ‘बाहुबली-२’मध्ये या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जमली होती. प्रेक्षकांनी तर या दोघांनीच आयुष्यभर एकत्र राहावे, असा कयासही लावला होता. मात्र हे दोघे विवाह करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने चाहत्यांमध्ये हिरमोड झाला होता. आता प्रभास उद्योगपतीच्या नातीबरोबर विवाह करणार नसल्याने त्याच्या मनात अनुष्काप्रती प्रेमांकुर फुलावे अशीच अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जाणार नाही, तरच नवल.