Join us

Confirm : 'आदिपुरूष'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणार प्रभास, पण सीता कोण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 9:40 AM

आतापर्यंत प्रभासच्या या सिनेमातील भूमिकेबाबत केवळ अंदाज बांधले जात होते. पण आता दिग्दर्शक ओम राऊतने कन्फर्म केलंय की, या सिनेमात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'आदिपुरूष' सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. या पौराणिक कथेवर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' फेम दिग्दर्शक ओम राऊत करणार आहे. आतापर्यंत प्रभासच्या या सिनेमातील भूमिकेबाबत केवळ अंदाज बांधले जात होते. पण आता दिग्दर्शक ओम राऊतने कन्फर्म केलंय की, या सिनेमात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

रामाच्या भूमिकेसाठी प्रभास परफेक्ट

मिड डेच्या एका रिपोर्टनुसार, ओम राऊतने सांगितले की, जेव्हा त्याने या सिनेमात भगवान रामच्या भूमिकेबाबत विचार केला तेव्हा त्याच्यासमोर केवळ आणि केवळ प्रभासचा चेहरा आला होता.तो म्हणाला की, रामाची भूमिका प्रभासपेक्षा चांगली दुसरं कुणी करू शकणार नाही. प्रभास सध्या देशातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे आणि या भूमिकेसाठी त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये शांति आणि आक्रामकता दोन्हीचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. 

भूमिकेसाठी खास तयारी

बाहुबली सिनेमात प्रभास एक योद्धा म्हणून समोर आला होता. पण आदिपुरूष मध्ये त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. या सिनेमात त्याला एक योद्धा कमी आणि धनुर्धर अधिक दिसायचं आहे. यासाठी प्रभासने एक्सपर्टसोबत बोलणी केली आहे. त्याने शरीरावर कामही सुरू केलंय. काही दिवसात प्रभास धनुर्विद्याही शिकणार आहे.

सीतेच्या भूमिकेत कोण?

ओम राऊतने हे कन्फर्म केलंय की, भगवान रामाची भूमिका प्रभास साकारणार आहे. त्यामुळे सीता, लक्ष्म आणि हनुमानाची भूमिका कोण साकारणार याचे अंदाज बांधले जात आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, ओम राऊतने काही दिवसांपूर्वी स्क्रीप्ट अभिनेत्री कीर्ती सुरेशला ऐकवल्याचे समजते. पण याबाबत कन्फर्म काहीही सांगण्यात आलेले नाही.

रावणाच्या भूमिकेत कोण?

ओम राऊतच्या आधीच्या सिनेमात सैफ अली खान याने व्हिलनची भूमिका साकारली होती.  या भूमिकेचं कौतुकही करण्यात आलं होतं. आता काही रिपोर्ट्सनुसार, आदिपुरूष मधेही सैफ व्हिलनी भूमिका साकारू शकतो. पण ही केवळ चर्चा आहे. याबाबत ओम राऊतने अजून काहीही कन्फर्म केलेलं नाही

आदिपुरूष हा सिनेमा थ्रीडी असेल आणि हिंदीसहीत तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतरही काही भाषांमध्ये डब केली जाणार आहे. आदिपुरूषचं शूटींग २०२१ मध्ये सुरू होईलल आणि हा सिनेमा २०२२ मध्ये रिलीज करण्याचा प्लॅन आहे.

हे पण वाचा :

प्रभासकडून मराठमोळ्या ओम राऊतच्या कामाचं भरभरून कौतुक, 'आदिपुरूष'मधील भूमिकेबाबत म्हणाला...

'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन!

दीपिका पादुकोनसोबतच्या सिनेमासाठी प्रभास घेणार रेकॉर्ड ब्रेक मानधन, किती ते वाचून चक्रावून जाल...

 

टॅग्स :प्रभासबॉलिवूड