आमिर खान आणि अनुष्का शर्माचा यांचा सुपरहिट 'पीके' सिनेमाने रसिकांचे भरघोस मनोरंज करत तुफान पसंती मिळवली होती. आजही सिनेमा तितक्याच आवडीने रसिक पाहातात. रणबीर कपूरही या सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये दिसला होता. आता सिनेमाच्या सिक्वेलचीही तयारी सुरु झाली आहे. रणवीर कपूर आमिर खानची भूमिका साकरणार असल्याचे बोलले जात आहे. आमिर खाननंतर ही कहाणी रणबीर कपूर पुढे नेईल, अशी चर्चा आहे. निर्माता विधु विनोद चोप्रा यांनीही यासाठी पूर्ण तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.
सिनेमात अद्याप आमिर खानची भूमिका कोण साकारणावर याविषयी माहिती समोर आली नसली तरी रणबीरला 'पीके २' मध्ये देण्यात येणाऱ्या मुख्य भूमकेची हिंट पहिल्या भागाच्या सिनेमाच्या शेवटी देण्यात आली होती. सिनेमाच्या शेवटी रणबीरला दाखवण्यात आले होते. त्याचवेळी सिनेमाचा सिक्वेल येणार आणि रणबीर कपूरच मुख्य भूमिका साकारणार त्याचवेळी स्पष्ट झाले होते.
विधु विनोद चोप्रा यांच्या सिनेमा पाहिले तर कथा हीच मुळात हिरो असते. त्यामुळे त्यांना असेच सिनेमा करायला आवडतात ज्यामुळे रसिकही खिळून राहतो. सिनेमा हा केवळ नफा कमावण्याचे माध्यम नाही असेही त्यांनी सांगितले, मुळात मी नफा कमावण्यासाठी सिनेमा बनवत नाही. जर असे राहिले असते तर मुन्नाभाई एकबीबीएसचे ६ ते ७ सिक्वेल आणि पिकेचेही २-३ सिक्वेल आले असते. मुळात कामातून समाधान मिळणे गरजेचे आहे.
'पीके' चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते, त्यांनी मुन्नाभाई सिनेमाचे दोन्ही सिक्वेल आणि '3 इडियट्स' आणि 'संजू'सारखे हिट सिनेमांचेही दिग्दर्श केले होते. पीकेचा सिक्वेल बनल्यास संजूनंतर रणबीरसोबत हिरानीचा हा दुसरा सिनेमा असेल. 'पीके' मधे सुशांत सिंग राजपूत, बोमन इराणी, संजय दत्त, परीक्षित सहनी आणि सौरभ शुक्ला यांच्या व्यतिरिक्त आमिर खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होते. प्रत्येक परिस्थितीत तो समोरच्याला प्रश्न विचारत असे. आमिरच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यामुळे पिकेचा सिक्वेल रणबीर कपूर रपेरी पडद्यावर कितपत कमाल दाखवणार हे पाहणे रंजक असणार आहे.