Confirm : ‘ट्यूबलाइट’च्या प्रमोशनसाठी झू झू येणार भारतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2017 5:07 PM
सध्या बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या मचअवेटेड ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आणि पहिले गाणे ...
सध्या बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या मचअवेटेड ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आणि पहिले गाणे रिलीज करण्यात आले असून, त्यामधील सलमानचा अंदाज प्रेक्षकांना खूपच भावला आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ईदला रिलीज होणार असून, भारत-चीन युद्धावर चित्रपट आधारित आहे. चित्रपटात चिनी अभिनेत्री झू झू ही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत असून, प्रमोशनसाठी ती भारतात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. कबीर खानसोबत सलमानचा हा तिसरा चित्रपट आहे. याअगोदर ‘बजरंगी भाईजान’, ‘एक था टायगर’ या चित्रपटात या जोडीने काम केले आहे. दरम्यान, सलमानच्या आगामी ‘ट्यूबलाइट’मध्ये चिनी अभिनेत्री झू झू त्याच्या अपोझिट असून, चित्रपटातील तिची भूमिका महत्त्वपूर्ण समजली जात आहे. याविषयी बोलताना कबीर खानने म्हटले की, कोणत्याही चित्रपटात अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारत असते. त्याप्रमाणेच या चित्रपटात झू झूची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ज्याविषयी आम्ही अद्यापपर्यंत फारसे बोललो नाही. मात्र आता झू झू प्रमोशनसाठी भारतात येणार असल्याने तिच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु तिच्या येण्यासाठी आम्ही अद्यापपर्यंत फारसा प्लॅन केला नसल्याचेही कबीरने स्पष्ट केले. चायनीज बॉक्स आॅफिसवर ‘पीके’ आणि ‘दंगल’ला मिळत असलेल्या यशाचा विचार करता ‘ट्यूबलाइट’चे निर्माते चीनमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यासाठी विशेष प्लॅन करीत आहेत. कबीरच्या मते, जेव्हा भारतीय चित्रपटाच्या रिलीजविषयी बोलले जाते तेव्हा चायनाच्या मार्केटमध्ये वेगळेच वातावरण असते. ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट २०१५ मध्ये आलेल्या ‘लिटिल बॉय’ या हॉलिवूडपटावरून प्रेरित आहे. मात्र भारतीय प्रेक्षकांचा विचार करता कबीरने चित्रपटात बरेचसे बदल केले आहेत. कबीरच्या मते, हा चित्रपट ‘लिटिल बॉय’ या हॉलिवूडपटावर आधारित आहे. मात्र आम्ही या चित्रपटाची केवळ आयडिया घेतली आहे. दरम्यान, ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात सलमान लक्ष्मणची भूमिका साकारत असून, त्याला प्रत्येक गोष्ट खूपच उशिरा समजत असते. त्यामुळेच त्याला ‘ट्यूबलाइट’ असे म्हटले जाते. चित्रपटाची शूटिंग लडाख, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये करण्यात आली आहे. चित्रपटात दिवंगत अभिनेते ओमपुरी, मॅटिन रे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे किंग शाहरूख खान यामध्ये कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे.