Join us

​राणा डग्गूबातीने का केले टीम ‘बाहुबली’चे अभिनंदन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 8:20 AM

‘बाहुबली’च्या चाहत्यांना आम्ही एक फक्कड बातमी पुरवली होती. होय, ‘बाहुबली: दी बिगीनिंग’ हा चित्रपट तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिलात. लवकरच ...

‘बाहुबली’च्या चाहत्यांना आम्ही एक फक्कड बातमी पुरवली होती. होय, ‘बाहुबली: दी बिगीनिंग’ हा चित्रपट तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिलात. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे ‘बाहुबली: दी कन्क्लूजन’ तुम्ही बघणार आहात. पण  आता तुम्ही ‘बाहुबली’ वाचू सुद्धा शकणार आहात. म्हणजेच, ‘बाहुबली’ची संपूर्ण कथन करणारे पुस्तक बाजारात आलेय. जवळच्या पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक उपलब्ध आहे. ‘बाहुबली’भल्लाळ देव म्हणजेच राणा डग्गूबाती याने टिष्ट्वटरवरून याबद्दलची माहिती दिलीय.Congratulation !! Not everyday do we see a film being made immortal through a book!! @ssrajamouli@Shobu_ I salute you!!‘!! असे टिष्ट्वट राणाने केले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी एका साहित्य महोत्सवात एक पुस्तक प्रकाशित केले. यात ‘बाहुबली: दी बिगीनिंग’च्या आधीची संपूर्ण कथा कथन करण्यात आली आहे.‘राइज आॅफ शिवगामी: बाहुबली बिफोर दी बिगीनिंग’ असे या पुस्तकाचे नाव आहे. जयपूर साहित्य महोत्सवात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला होता. यावेळी  राजामौली यांच्यासोबतच राणा डग्गूबाती हाही हजर होता. यावेळी त्याने या पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवले होते. आनंद नीलकांतन यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात ‘बाहुबली : दी बिगीनिंग’ आधीची संपूर्ण  कथा आहे. म्हणजेच शिवगामी आपल्या पित्याच्या हत्येचा सूड कसा घेतो, हे यात वाचायला मिळणार आहे. चित्रपटात ही भूमिका राम्या कृष्णन हिने साकारली आहे. ALSO READ : super excited !! पाहा, ‘बाहुबली2’च्या ट्रेलरची एक झलक!‘कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं’ हे कोडं सोडवायचं असेल तर हे वाचा!२०१५ मध्ये आलेल्या  ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक  १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती.  ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच या चित्रपटाद्वारे अपार लोकप्रीयता मिळवली. आता प्रभाव व राणाला  ‘बाहुबली2’मध्ये पाहण्यास लोक उत्सूक आहेत.