Join us

मोठी बातमी: 'आदिपुरुष'मधील वादग्रस्त डायलॉग बदलणार, मनोज मुंतशिरने ट्विट करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 2:06 PM

Adipurush Row:  ‘जय श्री राम’ गीत नाही ऐकले, ‘शिवोहम’ नाही ऐकले, ‘राम सिया राम’ नाही ऐकले? आदिपुरुष मधील सनातनची ही स्तुती माझ्याच लेखणीतून जन्मली आहे. ‘तेरी मिट्टी’ और ‘देश मेरे’ हेही मीच लिहिले आहे.'

आदिपुरुष चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. या चित्रपटातील काही वादग्रस्त डायलॉग बदलण्यात येणार असून, याच आठवड्यात ही सुधारणा केली जाणार आहे, अशी माहिती गायक मनोज मुंतशिरने ट्विटद्वारे दिली आहे. मनोज मुंतशिर ट्विट करत म्हणाला, रामकथेतून पहिला धडा कुणी शिकू शकतो, तर तो आहे, प्रत्येकाच्या भावनेचा आदर करणे. योग्य आणि अयोग्य, हे काळानुसार बदलत जाते. पण भावना राहते. आदिपुरुषमधील 4000 हून अधिक ओळींचा संवाद अथवा डायलॉग्ज मी लिहिले आहे. 5 ओळींवरून काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्या शेकडो ओळींमध्ये, जेथे श्री रामचंद्रांचे यशगान केले आहे, माता सीता यांच्या सतीत्वाचे वर्णन केले आहे, त्यासाठी प्रशंसाही मिळायला हवी होती, माहीत नाही, ती का मिळाली नाही. सोशल मीडियावर माझ्याच भावांनी माझ्यासाठी अशोभनीय शब्द वापरले.

काय म्हणाला मनोज मुंतशिर - आपल्या ट्विटमध्ये मनोज मुंतशिर म्हणाला, तेच माझे लोक, ज्यांच्या पूज्य आईसाठी मी टीव्हीवर अनेक वेळा कविता म्हटल्या, त्यांनी माझ्याच आईसाठी अश्लील शब्द वापरले. मी विचार करत राहिलो की, मतभेद असू शकतात, पण माझ्या बंधूंच्या मनात अचानकपणे एवढी कटुता कुठून आली? की ते प्रत्येक आईला आई मानणाऱ्या श्री रामाचा दर्शन विसरले. शबरीच्या पायाजवळ असे बसले, जसे माता कौशलेच्या पायाजवळ बसले. असे असू शकते की, 3 तासांच्या या चित्रपटात, मी 3 मिनिटांसाठी काही माझ्या कल्पनेने वेगळे लिहिले असेल. पण आपण माझ्या माथ्यावर सनातन-द्रोही लिहिण्याची एवढी घाई का केली. मला समजूशकले नाही..

सनातनवर मुंतशिर म्हणाला...- मुंतशीरने पुढे लिहिले, ‘जय श्री राम’ गीत नाही ऐकले, ‘शिवोहम’ नाही ऐकले, ‘राम सिया राम’ नाही ऐकले? आदिपुरुष मधील सनातनची ही स्तुती माझ्याच लेखणीतून जन्मली आहे. ‘तेरी मिट्टी’ और ‘देश मेरे’ हेही मीच लिहिले आहे. माझी तुमच्याकडे कसलीही तक्रार नाही, आपण माझेच होतात, आहात आणि रहाल. आपणच एक-मेकांविरोधात उबे राहिलो तर सनातनचाच पराभव होईल. आम्ही आदिपुरुष सनातनच्या सेवेसाठी तयार केला आहे. जो आपण मोठ्या संख्येने पाहत आहात आणि मला विश्वास आहे की, पुढेही पाहत राहाल.

आदिपुरुषच्या डायलॉगमध्ये सुधारणा होणार - आपण हे ट्विट का लिहिले? हेही मनोज मुंतशिरने पुढे सांगितले आहे. तो म्हणतो, कारण आपल्या भावनांपेक्षा माझ्यासाठी काहीच मोठे नाही. मी माझ्या संवादासंदर्भात अनेक तर्क देऊ शकेन. पण याने आपल्या वेदना कमी होणार नाहीत. मी आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शक यांनी, ज्या डायलॉगमुळे आपल्या भावना दुखावल्या आहेत, त्यात सुधारणा करून, ते याच आठवड्यात चित्रपटात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.श्री रामांची आपणा सर्वांवर कृपा असो! 

टॅग्स :आदिपुरूषबॉलिवूड