‘कामसूत्र 3 डी’ची अभिनेत्री सायरा खान हिचे गत शुक्रवारी निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने सायराचे निधन झाल्याचे कळतेय. ‘कामसूत्र 3 डी’ या चित्रपटात सायराची ऐनवेळी शर्लिन चोप्राच्या जागी वर्णी लागली होती.चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी शर्लिनवरून मोठा वादही झाला होता. या वादामुळे सायराला म्हणावी तशी लोकप्रियता मिळू शकली नाही. ‘कामसूत्र 3 डी’चे निर्माता रूपेश पॉल यांनी सायराच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. ‘शर्लिनच्या जागी ‘कामसूत्र 3 डी’मध्ये सायराला घेण्यात आले. पण यानंतर सायराने अनेक अडचणींचा सामना केला. सायरासाठी ही भूमिका प्रचंड आव्हानात्मक होती. ती एका मुस्लिम कुटुंबातून आली होती. त्यामुळे सायराला चित्रपटात घेताना आम्हालाही अडचणी आल्यात. पण सायराने अतिशय कष्टाने या भूमिकेला न्याय दिला. तिच्याऐवजी अन्य कुठलीही अभिनेत्री ही भूमिका साकारू शकली नसती, असे पॉल म्हणाले.त्यांनी सायराच्या मृत्यूवर संवेदना व्यक्त करत, बॉलिवूडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सायरा एक उत्तम अभिनेत्री होती. पण ती गेल्यावर कुणीही तिच्या मृत्यूबद्दल सांत्वनाचा एक साधा शब्दही काढला नाही. मला याचे सर्वाधिक दु:ख वाटतेय. तिच्या आत्म्याला शांती मिळो, असे ते म्हणाले.
‘कामसूत्र 3 डी’ची अभिनेत्री सायराचे निधन, इंडस्ट्रीकडून साधा शोकही नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 1:06 PM
‘कामसूत्र 3 डी’ची अभिनेत्री सायरा खान हिचे गत शुक्रवारी निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने सायराचे निधन झाल्याचे कळतेय. ‘कामसूत्र 3 डी’ या चित्रपटात सायराची ऐनवेळी शर्लिन चोप्राच्या जागी वर्णी लागली होती.
ठळक मुद्दे‘कामसूत्र 3 डी’चे निर्माता रूपेश पॉल यांनी सायराच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.