Join us

वादग्रस्त विधानांमुळे कंगना एकाकी, ऊर्मिला मातोंडकरचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 4:16 AM

ऊर्मिलानेही ट्विटकरून वर्मा आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानले. कंगनाने मात्र आपण स्वत:हून कधीच भांडत नाही, असा दावा आता केला आहे.

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहणारी कंगना रानौत आता स्वत:च एकटी पडत चालल्याचे दिसत आहे. दुसरीकडे सर्व स्तरांतून ऊर्मिला मातोंडकर यांना समर्थन मिळू लागले आहे. कंगनाने ऊर्मिला मातोंडकराला ‘सॉफ्ट पोर्नस्टार’ म्हटल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. कंगनाला दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला अष्टपैलू अभिनेत्री आहे, असे म्हणून उत्तर दिले.ऊर्मिलानेही ट्विटकरून वर्मा आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानले. कंगनाने मात्र आपण स्वत:हून कधीच भांडत नाही, असा दावा आता केला आहे. मी भांडखोर असल्याचे कोणी सिद्ध केल्यास मी स्वत:हून ट्विटटर सोडेन, असे म्हटले.आपल्याला भाजपला मतदान करायचे होते, पण भाजप उमेदवार नसल्याने आपण नाइलाजाने शिवसेनेला मत दिले, असे कंगना एका मुलाखतीत म्हणाली. त्यावर ती जिथे मतदान करते, तिथे लोकसभा आणि विधानसभेला भाजपचाच उमेदवार होता, असे एका पत्रकाराने लक्षात आणून दिले. त्यामुळे कंगना भडकली आणि तुम्ही चुकीची माहिती देत आहात, मी तुम्हाला कोर्टात खेचेन, तुरुंगात धाडेन, अशी धमकी ट्विटरवरून दिली.कंगनाचे ट्विट पाहिल्यानंतर स्टॅँडअप कॉमेडियन आणि लेखक अभिजित गांगुली यांनी तिला ट्विटर सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी लिहिले की, कृपया ट्विटटर सोडून द्या. त्यामुळे कोरोना युद्धातील डॉक्टरांचे मृत्यू, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, बेरोजगारीचे संकट, घसरलेला जीडीपी या देशापुढील खऱ्या व गंभीरवर परिस्थिवर लक्ष केंद्रित होईल. कंगनाने अभिजीत गांगुली यांच्यावर पलटवार करीत लिहिले की, ‘ते (सोनम आणि दिया) हत्याचे आरोपी ड्रग्स घेणाऱ्यांसाठी लढत होते. माझे नाव मुद्दाम त्यात समाविष्ट करण्यात आले.अनुराग कश्यपने सुनावलेआपण क्षत्रिय असल्याचे टिष्ट्वट कंगनाने केले होते. त्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपने कंगनाला चीनविरोधात लढाई करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे संतापून कंगनाने अनुरागना तुम्ही मंदबुद्धीचे आहात, बी ग्रेड चित्रपट काढता, असे असे ट्विट केले.

टॅग्स :कंगना राणौतउर्मिला मातोंडकरबॉलिवूड