Controversy : दिग्दर्शकांनी कट-कट म्हटले तरी विनोद खन्ना डिंपलला करीत राहिले किस!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 8:43 AM
दीर्घ आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेले अभिनेते विनोद खन्ना यांचा ९० च्या दशकातील प्रवास खूपच रोमांचक ...
दीर्घ आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेले अभिनेते विनोद खन्ना यांचा ९० च्या दशकातील प्रवास खूपच रोमांचक होता. यशाची एक एक पायरी पादाक्रांत करताना विनोद खन्ना कॉन्ट्रोव्हर्सीच्याही जाळ्यात अडकले होते. त्यातील आजही आठवणारा किस्सा म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडियाबरोबरचा किस सीन्स होय. विनोद खन्ना यांची आॅनस्क्रीन प्रियसी असलेल्या डिंपलबरोबर त्यावेळी घडलेला हा प्रसंग तिच्यासाठी धक्कादायक होता, तर विनोद खन्ना यांच्यावर टीकेचा भडिमार करणारा होता. कारण या प्रकरणामुळे विनोद खन्ना त्यावेळी चांगलेच चर्चेत आले होते. त्याचे झाले असे की, ‘प्रेम धरम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिंपल आणि विनोद खन्ना यांच्यात एक इंटीमेट सीन्स शूट करायचा होता. या सीनमध्ये विनोद खन्ना यांना डिंपलला किस करायचे होते. ठरल्यानुसार सीन्सला सुरुवात करण्यात आली; मात्र विनोद खन्ना हे स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाही. दिग्दर्शकांनी कट-कट म्हटले तरी ते डिंपलला किस करतच राहिले. त्यांना स्वत:ला थांबविणे शक्य झाले नाही; अखेर दिग्दर्शकांनाच धाव घेत विनोद खन्ना यांना बाजूला सारावे लागले. हा संपूर्ण प्रसंग डिंपल यांच्यासाठी खूपच शॉकिंग होता. खरं तर विनोद खन्ना त्यावेळी प्रचंड व्यस्त असलेले अभिनेते होते. दिवसाचे शेड्यूल पूर्ण करून त्यांना रात्रीच्या शेड्यूलमध्ये हा सीन शूट करायचा होता. वास्तविक सुरुवातीला विनोद खन्ना यांनी डिंपलला मिठी मारून किस करीत हा सीन पूर्ण केला होता. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या महेश भट्टच्या या सीन्समुळे समाधान झाले नव्हते. त्यांनी यात आणखी इंटेसिटी आणण्यासाठी एक टेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र विनोद खन्ना स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, ते डिंपलला किस करीत राहिले. विशेष म्हणजे यावेळी महेश भट्ट सारखे कट-कट म्हणत होते. परंतु दोघांमधील अंतर अधिक असल्याने त्यांच्या कानावर भट्ट यांचा आवाज पोहोचलाच नाही. परंतु जेव्हा ही बाब विनोद यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी लगेचच डिंपलची माफी मागितली. तसेच महेश भट्ट यांचीही त्यांनी माफी मागितली होती. परंतु भडकलेल्या डिंपलने विनोद यांना माफ करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. चित्रपटाची कायमची शूटिंग थांबविलीविनोद खन्ना यांनी केलेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या डिंपलने शूटिंगला स्पष्ट शब्दात नकार दिला. जेव्हा महेश भट्ट यांनी डिंपलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते नशेत असल्याची माहिती समोर आली होती. विनोद यांनी नशेच्या भरात हा सर्व प्रकार केल्याची वार्ता वाºयासारखी पसरली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही केली गेली. मात्र अशातही डिंपलचा संताप कमी झाला नव्हता. अखेर हा चित्रपट रिलीजच होऊ शकला नाही. त्यानंतर या चित्रपटाचे नाव बदलून शूटिंग पूर्ण करण्यात आले. १९९२ मध्ये हा चित्रपट थेट होम व्हिडीओमध्ये रिलीज केला गेला. हेमा मालिनी यांच्या अंकलचा होता प्रोजेक्ट‘प्रेम धरम’ हा हेमा मालिनी यांच्या अंकलचा प्रोजेक्ट होता. त्यांनीच विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया यांना कास्ट केले होते. तर दिग्दर्शकपदाची धुरा महेश भट्ट यांनी साकारली होती.