Join us

It's Full of Drama : पोलिसांनी अतिरेकी समजून पकडले; हृतिक रोशनच्या फिल्मचे अ‍ॅक्टर्स निघाले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 11:12 AM

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात दोन अतिरेकी असल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट जारी केला गेला आणि अतिरेक्यांना पकडण्यासाठी सर्च आॅपरेशन सुरु झाले. काही तासात पोलिसांनी या दोन दहशतवाद्यांना पकडले. पण यानंतर जे काही समोर आले, ते बघून सगळेच थक्क झालेत.

ठळक मुद्दे यशराज फिल्मसने या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र याबद्दल कुठलाही अधिकृत खुलासा केलेला नाही.

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात दोन अतिरेकी असल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट जारी केला गेला आणि अतिरेक्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु झाले. काही तासात पोलिसांनी या दोन दहशतवाद्यांना पकडले. पण यानंतर जे काही समोर आले, ते बघून सगळेच थक्क झालेत. होय, पोलिसांनी ज्या दोघांना अतिरेकी म्हणून पकडले. ते अतिरेकी नाही तर अ‍ॅक्टर्स निघालेत.

होय,एटीएम गार्ड अनिल महाजन याने पंचवटी नाना भागात या दोन्ही कलाकारांना  मदिहशतवाद्यांच्या वेशभूषेत पाहिले. गार्डने घरून जेवणाचा डबा आणला नव्हता. त्यामुळे काही तरी खायचे म्हणून तो बाहेर पडला. याचदरम्यान त्याची नजर या दोघांवर गेली. दहशतवाद्यांच्या वेशभूषेतील या दोघांचेही वागणे त्याला संशयास्पद वाटले. यापैकी एकजण सिगरेट खरेदी करत होता आणि दुसरा व्हॅनमध्ये बसून त्याची प्रतीक्षा करत होता. गार्डने त्वरित पोलिसात असलेल्या आपल्या भावाला फोन लावला. यानंतर पोलिस विभागात खळबळ माजली. सीसीटीव्हीच्या मदतीने अतिरेक्यांच्या वेशभूषेतील त्या दोघांनाही पकडले. पण यानंतर चौकशीदरम्यान हे दोघे दहशतवादी नसून दहशतवाद्यांच्या वेशभूषेतील कलाकार आहेत, हे स्पष्ट झाले. हे दोघेही यशराज फिल्मसाठी शूटींग करत होते. पोलिस त्यांना घेऊन यशराजच्या सेटवर पोहोचले आणि त्यांनी दिलेली माहिती खरी निघाली.

अरबाज खान आणि बलराम गिनवाल अशी त्यांची नावे. प्राप्त माहितीनुसार, हे दोघेही हृतिक रोशन व टायगर श्रॉफच्या एका आगामी चित्रपटाचे शूटींग करत होते. मुंबई मिररशी बोलताना यशराज फिल्मसने या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र याबद्दल कुठलाही अधिकृत खुलासा केलेला नाही.

टॅग्स :हृतिक रोशनमुंबई पोलीस