Join us

शाहरुख खानही आरोपीच, समीर वानखेडेंना दिलासा; कोर्टाचा सविस्तर निर्णय वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 8:57 AM

शाहरुख खानच्या अडचणीत वाढ

कॉर्डेलिया क्रूझप्रकरणी एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) सीबीआयच्या कचाट्यात सापडले आहेत. यामध्ये लाच घेतल्याप्रकरणी समीर वानखेडे आरोपी म्हणून आढळले आहेत. दरम्यान मुंबई उच्चन्यायालयाने समीर वानखेडेंना दिलासा दिला आहे. न्यायालयाने वानखेडेंना याचिकेत सुधारणा करण्यास आणि माहिती जोडण्यास परवानगी दिली आहे. या याचिकेत वानखेडेंनी लाच देणाऱ्यावरही केस दाखल करणाऱ्याची मागणी केली होती. 

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स केसमध्ये फसवू नये म्हणून समीर वानखेडेंनी लाच घेतल्याचा आरोप होता. २५ कोटींचं हे लाच प्रकरण होतं. मात्र शेवटी १८ कोटी रुपयांची डील झाली होती. नंतर २०२३ मध्ये वानखेडे उच्च न्यायालयात गेले आणि ही केस बंद करण्यासाठी आणि अंतरिम जामीनसाठी मागणी केली होती.

५ जुलै २०२३ मध्ये वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा, रिझवान मर्चंट  आणि स्नेहा सानप यांनी याचिकेत सुधारणा करण्याची मागणी केली. प्रिव्हेंशन ऑफ प्रोटेक्शन एक्ट अंतर्गत कलम 7, 7a आणि 8 नुसार याचिकेत अतिरिक्त माहिती देण्याची परवानगी मागितली. तसंच ज्या व्यक्तीने सरकारी कर्मचाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरही केस दाखल करण्याची मागणी केली.

न्यायाधीश एएस गडकरी आणि एसजी डीगे च्या खंडपीठाने याचिकेत सुधारणा करण्यास परवानगी दिली. आता या याचिकेवर २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत सीबीआयला या सुधारित याचिकेवर उत्तर द्यावं लागणार आहे. तसंच समीर वानखेडेंची अटकेपासूनची अंतरिम सुरक्षाही वाढवली आहे.

टॅग्स :शाहरुख खानसमीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोअमली पदार्थलाच प्रकरण