Join us

Corona Breaking : कनिका कपूरची चौथी कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 17:49 IST

कनिकाच्या याआधी घेण्यात आलेल्या सर्व टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कनिका सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेत आहे. तिचा चौथा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने तिच्या कु टुंबियांतही काळजी वाढली आहे.  

कोरोना व्हायरसने भारतातही अक्षरश: उच्छाद मांडला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह निदान झालेली एकमेव भारतीय सेलिब्रेटी म्हणजे कनिका कपूर. तिच्याबाबत एक चिंताजनक बातमी माहिती समोर आली आहे. नुकतीच तिची चौथी कोरोना व्हायरस टेस्ट करण्यात आली. ही टेस्टही पॉझिटिव्ह आली असल्याचे निदर्शनास आले आहे. कनिकाच्या याआधी घेण्यात आलेल्या सर्व टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कनिका सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेत आहे. तिचा चौथा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने तिच्या कुटुंबियांतही काळजी वाढली आहे.  

कनिका कपूर ९ मार्चला लंडनमधून भारतात परतली होती. त्यांनंतर जवळपास १० दिवस ती वेगवेगळ्या लोकांना भेटली. याशिवाय तिनं एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. त्यानंतर २० मार्चला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. यामध्ये तिनं आपण लंडनमधून परतल्यावर ठिक होतो मात्र मागच्या २ दिवसांपासून मला कोरोनाची लक्षणं दिसू लागली असं म्हटलं होतं. मात्र तिच्या निष्काळजीपणासाठी आणि इतर लोकांच्या आरोग्यशी खेळल्याबाबत उत्तरप्रदेशात तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.

दरम्यान कनिकानं अटेंड केलेल्या पार्टीत वसुंधरा राजे आणि त्यांच्या मुलासह अनेक बड्या राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली होती. या जवळपास २६२ लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ६० लोकांचे मेडिकल रिपोर्ट आले असून हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. याशिवाय कनिका भारतात परतल्यावर तिनं विमानतळावरील तपासणीपासून वाचण्यासाठी बाथरुममध्ये लपून राहिल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे.

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्या