सुंदर आणि फीट दिसणं यासाठी जॅकलिन खूप मेहनत घेते. ती दिवसाची सुरुवात योगा ने करते . स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसातून 108 वेळा सूर्य नमस्कार करते. ती नियमितपणे आष्ठांग योगही करते. तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल होत असतात. कोरोनापासून बचावासाठी ती सध्या बाहेर न पडता घरातच राहून योगा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच नियमित योगा करण्याबद्दल जॅकलिन सांगते, नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो.
योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो." असेही तिने सांगितले आहे.