कोरोनामुळे सर्व चित्रपट, दैनंदिन मालिका आणि ओटीटी प्रोडक्शंसचे शुटींग ठप्प झाल्यामुळे दैनिक वेतनावर काम करणाऱ्या कामगारांचे हाल सुरु आहेत अशा गरीब कामगारांसाठी एखादा रिलीफ फंड स्थापन करण्याबाबत देखील विचार सुरु आहे. या बाबतीत सर्वांच्या मदतीसाठी धावून येणारा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुढाकार घेत असतो. त्यामुळे या कामगारांना सलमान खानची आठवण झाली आहे.
याविषयी बोलताना दैनंदिन वेतन कामगार आणि ज्युनिअर आर्टीस्ट राजेंद्र लेखराज उर्फ पप्पू यांनी सांगितले की, कोरोनामुळे चित्रपट शुटींग ठप्प आहेत. आमच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कुठे जायचे असा प्रश्न आमच्यापुढे आहे. अशा स्थितीत मी सलमान खान यांच्याशी बोलणार आहे. ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. ते नेहमीच आमची काळजी घेत असतात. त्यांच्या 'बीइंग ह्यूमन' ने नेहमीच मुलांच्या विविध आजारांच्या उपचारासाठी मदत केली आहे. आमच्या पाठीशी देखील ते उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे.
आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली आहे.