Join us

Corona Effect:बॉलिवूडचे हे कपल अधिक झाले रोमांटीक पाहून नेटीझन्सनाही फुटला घाम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 14:12 IST

सध्या कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे दोघांना पहिल्यांदाच इतका एकत्र वेळ घालवायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग नको म्हणून बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. त्यातच असेही काही कपल आहेत. ज्यांना कामामुळे अजिबात एकमेकांसोबत वेळ घालवणे शक्यच होत नाही.यातच एका बॉलिवूड कपलने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेता रणवीर सिंह आणि बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण यांना तर लग्नानंतर एकत्र वेळ एन्जॉय करायला मिळालाच नाही. सततचे ते शूटिंग शेड्युअलमुळे हे दोघे नेहमीच बाहेर असतात. एकत्र येणे हा क्षण यांच्यासाऑी तरी दुर्मिळच. सध्या कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे दोघांना पहिल्यांदाच इतका एकत्र वेळ घालवायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्यांचे दोघांचे एकत्र फोटो ही ते सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत आहे. इतकेच नाही तर घरीच राहून वेळ मस्त एन्जॉय करा असेच प्रेरणा यांचे फोटो इतरांनाही देत आहे. 

सध्या रणवीरच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेय. होय, रणवीरने खास आपल्या सासरेबुवांसाठी म्हणजेच प्रकाश पादुकोण यांच्यासाठी ही खास पोस्ट लिहिली आहे. निमित्त काय तर, 40 वर्षांपूर्वी प्रकाश पादुकोण यांनी लंडनच्या वेम्बले एरेनामध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकली होती. सासरेबुवांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे स्मरण करत, रणवीरने पोस्ट लिहिली असून काही फोटोही शेअर केले आहेत.

तर ‘पापा, बॅडमिंटन व भारतीय क्रीडा क्षेत्रातील तुमचे योगदान अभूतपूर्व आहे. दुस-यांना सतत प्रेरणा देणारे तुमचे समर्पण, शिस्त, कटिबद्धता आणि वर्षांची कठोर मेहनत... या सगळ्यांसाठी खूप सारे प्रेम़ आम्हाला तुमचा अभिमान आहे,’ असे दीपिकाने लिहिले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसरणवीर सिंग