Corona Lockdown : मोदींच्या आवाहनावर बॉलिवूडकरांच्या प्रतिक्रिया...; तापसी म्हणाली, आणखी एक टास्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 12:17 PM2020-04-03T12:17:13+5:302020-04-03T12:17:42+5:30
घरोघरी दिवे लावा... मोदींचे आवाहन, सेलिब्रिटींचे बोल...
कोरोनाच्या गंभीर संकटाशी लढताना मला आपल्या सर्वांची 9 मिनिटे हवी आहेत. तेव्हा येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता केवळ 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील विजेचे दिवे बंद करा आणि गॅलरीव, घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती वा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावून सामूहिक शक्तीचे दर्शन घडवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि सोशल मीडियावर यावरच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. बॉलिवूडही त्याला अपवाद नाही. अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेता वीर दास अशा अनेकांनी यावर ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सर्वांनी मोदींच्या या आवाहनाला पाठींबा दिला आहे. अर्थात हा पाठींबा देताना काहीसा उपरोधिक टोलाही लगावला आहे.
तेव्हा पाहुयात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...
New task is here ! Yay yay yayy !!!
— taapsee pannu (@taapsee) April 3, 2020
नया टास्क, ये..ये..ये... असे अभिनेत्री तापसी पन्नूने लिहिले आहे. तिची प्रतिक्रिया पाठींबा आहे की टोला हे तुम्हीच ठरवलेले बरे.
विवेक अग्निहोत्री लिहितात...
Before idiots start trolling the PM, I must put on record that @narendramodi is the best leader India can get.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 3, 2020
He knows how to lead Indians emotionally and spiritually. There is no other way out.
काही वेडे लोक पीएमला ट्रोल करणे सुरु करतील त्यापूर्वी मी सांगू इच्छितो की, पीएम मोदी भारताचे बेस्ट लीडर आहेत. भारतीयांना भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे लीड करायचे हे ते जाणतात. याशिवाय दुसरा कुठला इलाजही नाही... असे विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.
वीर दास म्हणतो, ही दिवाळी समजू नका...
Repeat: Sunday is an INDOORS show of solidarity. It is NOT diwali.
— Vir Das (@thevirdas) April 3, 2020
कॉमेडिन, अॅक्टर, होस्ट वीर दास याने या निमित्ताने जनतेला एक सल्ला दिला आहे. होय, ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रसंग आहे. कृपया याला दिवाळी समजू नका, असे त्याने म्हटले आहे.
मेणबत्ती हा इलाज नाही...
Can we please have some real solutions for once!!!!
— Shruti Seth (@SethShruti) April 3, 2020
People are homeless, jobless and hungry and candles aren’t going to cut it.
कृपा करून खरा तोडगा मिळेल. लोकांना घर नाही, कामधंदे नाहीत, पोटात भूक आहे आणि मेणबत्ती हा त्यावरचा तोडगा नाही, असे ट्विट अभिनेत्री श्रुती सेठ हिने केले आहे.