करिनासोबत काम करणा-यांची होणार कोरोना चाचणी, प्रेग्नंसीमुळे घेतली जाते अधिक खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 11:02 AM2020-09-03T11:02:45+5:302020-09-03T11:08:38+5:30

'लाल सिंह चड्ढा' सिनेमा यावर्षी क्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार होणार होता. मात्र कोरोनाच्या जाळ्यात अडकल्यामुळे सिनेमाच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. सिनेमाची रिलीज डेट 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Corona Test Compulsory To Meet Kareena Kapoor On The Sets Of Laal Singh Chaddha | करिनासोबत काम करणा-यांची होणार कोरोना चाचणी, प्रेग्नंसीमुळे घेतली जाते अधिक खबरदारी

करिनासोबत काम करणा-यांची होणार कोरोना चाचणी, प्रेग्नंसीमुळे घेतली जाते अधिक खबरदारी

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रत्येक क्रू मेंबर आणि करीनाच्या जवळच्या संपर्कात असलेल्या कलाकारांची होणार कोरोना टेस्ट करीना प्रेग्नंट असल्यामुळे तिच्या सुरक्षेसाठी ही गोष्ट बंधनकारक करण्यात आली आहे. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

प्रेग्नंट असूनही करिना सध्या शूटिंग करत आहे. घरात आराम न करता काम करत राहण्याला ती पसंती देते. कोरोनामुळे शूटिंगला लागलेल्या ब्रेकमुळे घरात आराम केला आणि आता नुकतेच आपल्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या सिनेमाच्या शूटिंगलाही तिने सुरुवात केली आहे. या सिनेमात आमिर खानसोबत ती झळकणार आहे. कोरोनामुळे शूटिंग सेटवरही खूप खबरदारी पाळली जात आहे. कोरोनाच्या काळात शूट पुन्हा सुरू करण्यात आले असले तरी आमिर खान, करीना कपूर खान आणि लाल सिंग चड्ढाची संपूर्ण टीमने काही नियम आखले आहेत.

त्यानुसार ज्यांना सेटवर आमिर किंवा करीनाला भेटायचे असेल त्यांना सर्वप्रथम स्वतःची कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.ज्याची कोरोना चाचणी झालेली असेल त्याच व्यक्तिला या दोघांना भेटण्याची परवानगी असणार आहे. करीना प्रेग्नंट असल्यामुळे  तिच्या सुरक्षेसाठी ही गोष्ट बंधनकारक करण्यात आली आहे.तसेच  प्रत्येक क्रू मेंबर आणि करीनाच्या जवळच्या संपर्कात असलेल्या कलाकारांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे.

'लाल सिंह चड्ढा' सिनेमा यावर्षी क्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार होणार होता. मात्र कोरोनाच्या जाळ्यात अडकल्यामुळे सिनेमाच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. सिनेमाची रिलीज डेट 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. लाल सिंग चड्ढा सिनेमात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सिनेमात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी रसिकांना पाहायला मिळणार आहेत. अतुल कुलकर्णी द्वारा लिखित 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा अद्वैत चंदन द्वारा दिग्दर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूडचा रिमेक आहे.

Web Title: Corona Test Compulsory To Meet Kareena Kapoor On The Sets Of Laal Singh Chaddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.