Join us

Corona Virus:शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सिनेमांना लागले कोरोनाचे ग्रहण, चित्रपट व्यवसायावरही फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 10:50 AM

मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्समध्ये जाणे टाळावे, क्रीडा स्पर्धा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत किंवा त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाटच पाहायला मिळत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई येथील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव आदी शनिवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. नागरिकांनी शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत, मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्समध्ये जाणे टाळावे, क्रीडा स्पर्धा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत किंवा त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाटच पाहायला मिळत आहे. 

या शुक्रवारी दोन मराठी सिनेमा प्रदर्शित झाले सुबोध भावेचा मुख्य भूमिका असलेला 'विजेता' आणि बिग बी अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांचा मुख्य भूमिका असलेला  'एबी आणि सीडी'. तर हिंदी रूपेरी पडद्यावर इरफान खान आणि राधिका मदान यांच्या भूमिका असलेला 'अंग्रेजी मीडियम' सिनेमा प्रदर्शित झाला. कोरोनाची दहशत यंदा फ्रायडे रिलीजवर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे रसिकही सिनेमागृहांकडे वळले नसल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळाले. तसेच प्रदर्शित झालेला सिनेमांवरही कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' सिनेमाकडून खूप अपेक्षा होती. मात्र अपेक्षेनुसार हा सिनेमा बॉक्स ऑफिसरवर गल्ला जमवण्यात अपयशी ठरला आहे. ओपनिंगला या सिनेमाने केवळ 3.50 से 3.75  कोटी गल्ला जमवला आहे.तसेच थिएटरही आता बंद करण्यात आल्यामुळे चित्रपट व्यवसायावरही याचा चांगलाच फटका बसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसअंग्रेजी मीडियम