कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात दहशत आहे़ अद्यापही या व्हायरसवर कुठलाही इलाज सापडलेला नाही. पण बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिने मात्र कोरोनावरचे औषध शोधून काढले आहे. होय, कोरोनावरचे औषध मिळाल्याचा दावा सुश्मिताने केला आहे.सुश्मिताने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसोबत तिने एका औषधाच्या बॉटलचा फोटो शेअर केला आहे. या औषधाच्या बाटलीवर ‘स्टे अॅट होम’ असे लिहिले आहे. याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल. होय, कोरोनापासून बचावासाठी सुश्मिताने लोकांना घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.
सुशने आपल्या पोस्टमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे. या संकटाच्या काळात स्वत: डॉक्टर बनू नका, असा लाखमोलाचा सल्ला तिने दिला आहे. आपल्या मनाने कुठलीही औषधं घेऊ नका. यामुळे आजार बरा होण्याऐवजी धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टरांनी सुचवलेलीच औषध घ्या, असे सुश्मिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या शरीरात ibuprofen ची मात्रा आढळली असल्याचेही तिने लिहिले आहे. ibuprofen हे एक वेदनाक्षामक औषध अर्थात पेनकिलर आहे.
या औषधाचा वापर टाळा, असेही तिने लिहिले आहे. ibuprofen हे औषध घेणा-यांना कोरोनाचा अधिक धोका संभतवतो. त्यामुळे ibuprofen घेऊ नका. वेदनाक्षामक म्हणूनParacetamol घेणे एक चांगला विकल्प आहे. अर्थात माझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेऊ नका. तर डॉक्टरचा सल्ला घ्या, असेही सुश्मिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.