नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला जबरदस्त हादरा दिला आहे. आरोग्य व्यवस्थेचीही कंबर तुटली आहे. एवढेच नाही, तर रुग्णांना रुग्णालयांत बेड आणि औषधी मिळणेही कठीण झाले आहे. देशात कोरोना लशीच्या तुडवड्यासह साठेबाजी आणि काळाबाजारही सुरू झाला आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, बाजारात बनावट औषधांचीही विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. (CoronaVirus bollywood actress sophie chaudhary shared information about fake and original remdesivir injection)
यातच, बॉलीवुड अभिनेत्री आणि गायिका सोफी चौधरीने बाजारात विकल्या जात असलेल्या बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन्ससंदर्भात विशेष माहिती दिली आहे. रेमडेसिव्हिर, प्लाझ्मा थेरेपी अनेक वेळा कोरोनापासून बचावासाठी यशस्वी ठरते आहे. मात्र देशातील अनेक राज्यांत याची कमतरता आहे. यातच बनावट रेमडेसिव्हिर विकले जात असल्याचेही वृत्त आहे. याचसंदर्भात सोफी चौधरीने बनावट रेमडेसिव्हिरसंदर्भात सोशल मीडियावर विशेष माहिती शेअर केली आहे.
सोफी चौधरीने आपल्या आधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बाजूला बनावट रेमडेसिव्हिर तर दुसऱ्या बाजूला ओरिजिनल रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिसत आहे. या फोटोत इंजेक्शनच्या स्पेलिंगसह कोणते ओरिजिनल आणि कोणते डुप्लिकेट आहे, हे सांगण्यात आले आहे. या फोटोसह सोफी चौधरीने आपल्या चाहत्यांना आणि जनतेला बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
सोफी चौधरीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'हे होत आहे आणि हे लज्जास्पद आहे. कृपया सावध राहा आणि लक्ष ठेवा #RemdesivirBlackMarketing #Remdesivir #fake' सोफीचे हे ट्विट सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या ट्विटला लाईकदेखील केले आहे. तसेच अनेक जण कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.
कोरोना रुग्णांच्या उपचारात वापरल्या जत असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी अनेक रुग्णांचे नातलग दिवसभर भटकत आहेत. कारण देशभरात या इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे.
"शव जाळले जात आहेत अन् यांना रक्ताची 'खुशबू' येतेय; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला PM मोदीच जबाबदार"
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांना मोफत मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्शन -मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सर्व सरकारी, तसेच सरकारी रुग्णालयांतून खासगी रुग्णालयांत रेफर केलेल्या कोरोना रुग्णांना नि:शुल्क रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर, एखाद्या खासगी रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसेल आणि तेथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी ते आवश्यक असेल, तर तेथील जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या रुग्णालयासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. याशिवाय, मागणी प्रमाणे, विविध जिल्ह्यांना मुबलक प्रमाणात रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्यात यावे. जर आवश्यकता असेल, तर खासगी रुग्णालयांनाही निर्धारित दरांत रेमडेसिव्हिर द्यावात, असे आदेशही मुख्यमंत्री योगींनी दिले आहेत.
या दहा राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशामध्ये एका दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १० राज्यांमध्ये सापडले आहेत. या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत २८ कोटींहून अधिक सँपलची तपासणी झाली आहे. तसेच देशातील संसर्गाचा दर हा ६.२८ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ४८ हजार ७०० रुग्ण सापडले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये ३३ हजार ५५१ आणि कर्नाटकमध्ये २९ हजार ७४४ रुग्णांचे निदान झाले आहे.
CoronaVirus: धोकेबाज ड्रॅगन! चीननं आधी पुढे केला मदतीचा हात, आता भारताचा मेडिकल सप्लाय रोखला