कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडलं आहे. आता सलमान खानची मैत्रिण युलिया वंतूर खूप दुःखी झाली आहे. युलियाने ट्विट करत या महामारीसाठी तिने माणसांनाच जबाबदार ठरविले आहे.
चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसची लागण सुरू झाल्यानंतर आता हा व्हायरस जगातील कित्येक देशांमध्ये दाखल झाला आहे. काही देशांमध्ये परिस्थिती खूप गंभीर आहे. हळूहळू या व्हायरसने सगळीकडे उच्छाद मांडला आहे. भारत असा देश आहे जिथे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत सगळीकडे खबरदारी पाळली जात आहे आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान युलियाने ट्विट केले आहे.
युलिया रोमानियाची आहे आणि बऱ्याच कालावधीपासून ती सलमानच्या जवळच्या व्यक्तींमध्येदेखील तिचा समावेश आहे. युलियासोबत सलमान रिलेशनशीपमध्ये असल्याचं वृत्त समोर आले होते. मात्र या वृत्ताला दुजोरा न मिळाल्यामुळे या वृत्ताला पूर्णविराम लागला होता. युलिया सलमान खानसाठी कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे आहे आणि त्यांच्या कौटुंबिक सोहळे, सणांना ती सलमानसोबत पहायला मिळते.