Join us

कोरोनामुळे बॉलिवूडमध्ये हाहाकार, करण जोहरचे दोन सिनेमे डबाबंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 11:18 AM

कोरोना इफेक्ट!!

ठळक मुद्दे‘दोस्ताना 2’ या सिनेमाचे म्हणाल तर या सिनेमाची स्टारकास्टही फायनल झाली होती.

कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग अक्षरश: थांबलेय. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण कोरोनामुळे प्रभावित झाला आहे. कोरोनाचा वाढता धोका बघता, बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक चित्रपट व मालिकांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड इंडस्ट्रीला एक वेगळीच समस्या भेडसावत आहे. होय, झालेले नुकसान भरून काढणे आणि चित्रपटांसाठी पैसा उभा करणे  बॉलिवूड इंडस्ट्रीला कठीण जात असल्याचे चित्र आहे. याचाच परिणाम म्हणजे बॉलिवूडचे दोन आगामी सिनेमे डबाबंद झाल्याचे कळतेय. हे सिनेमे कोणते तर तख्त आणि दोस्ताना 2.होय, चर्चा खरी मानाल तर करण जोहरने तूर्तास ‘तख्त’ आणि ‘दोस्ताना 2’ हे दोन मोठे सिनेमे न बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड हंगामाने याबाबतचे वृत्त दिले आहे. ‘तख्त’ आणि ‘दोस्ताना 2’ या दोन्ही सिनेमांबद्दल करण जोहर कमालीचा उत्सुक होता. करणने स्वत: या दोन्ही सिनेमांची घोषणा केली होती. पण आता हे दोन्ही सिनेमे तूर्तास तरी बननण्याची चिन्हे नाहीत. करणच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तख्त’ची घोषणा झाली. पण चाहत्यांमध्ये फारसी क्रेज दिसली नाही. यामुळे करण आधीच संभ्रमात होता. त्यातच अलीकडे ‘तख्त’च्या स्क्रिप्ट रायटरने एक सांप्रदायिक टिष्ट्वट केले होते. यामुळे बनण्याआधीच या सिनेमाची निगेटीव्ह पब्लिसिटी झाली होती. अर्थात याऊपही करण हा सिनेमा बनवणार होता. पण कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान बघता ‘तख्त’ बनेल, याची शक्यता कमी आहे.

‘दोस्ताना 2’ या सिनेमाचे म्हणाल तर या सिनेमाची स्टारकास्टही फायनल झाली होती. कार्तिक आर्यन व जान्हवी कपूर यात लीड रोलमध्ये दिसणार होते. पण आता हा सिनेमाही होल्डवर ठेवण्यात आला आहे. अर्थात अद्याप धर्मा प्रॉडक्शननेया वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

टॅग्स :करण जोहरकोरोना वायरस बातम्या