बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनॉनने नुकतेच आगामी चित्रपट मिमीचं शूटिंग पूर्ण केलं आहे. यावेळी जगात कोरोना व्हायरसच्या भीतीचं सावट पसरले आहे. त्यामुळे बॉलिवूड व टेलिव्हिजन इंडस्ट्रीने शूटिंग थांबवलं आहे. तर चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींकडे कृति सेनॉनने कानाडोळा करीत मिमीनंतर आगामी चित्रपटाचं शूटिंग राजकुमार रावसोबत सुरू केले आहे. कृति व राजकुमार यांची जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अभिषेक जैनच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या चित्रपटात कृति सेनॉन व राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं जास्त शूटिंग मुंबईत होणार आहे. दिनेश विजानच्या मॅडडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात कृति व राजकुमार यांच्याशिवाय डिंपल कपाडिया व परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची जास्त स्क्रीप्ट तयार आहे. या चित्रपटाच्या टायटलबद्दल अद्याप कोणतीही ऑफिशिएल अनाउंसमेंट झाली नाही आहे.
कृति शेवटची अर्जुन कपूरसोबत पानिपतमध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले आहे.