जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. त्यात देशातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. यासोबतच त्यांनी पीएम केअर फंडमध्ये डोनेशन देण्यासाठी लोकांना विनंती केली. हा फंड आपातकालीन परिस्थितीत व लोकांच्या कामासाठी व उपचारासाठी वापरला जातो. त्यांनी मदतीची हाक देताच उद्योगपतींसोबत बॉलिवूड व मराठी सेलिब्रेटीही पुढे सरसावले. त्यात आता भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीदेखील कोरोनाशी लढण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच ट्विटरवर दिली आहे.लता मंगेशकर यांनी ट्विट केले की, नमस्कार.आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या कोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी.
CoronaVirus : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लता मंगेशकरही पुढे सरसावल्या, दिला इतका निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:35 PM