दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूचे चित्रपट एकानंतर एक सुपरहिट ठरले आहेत. त्याचे फक्त देशातच नाही तर जगभरात चाहते आहेत. इतकंच नाही तर कित्येक लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही या व्हायरसमुळे कित्येकांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकार व शासकीय यंत्रणा झटत आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी कित्येक कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. त्यात आता महेश बाबूही पुढे सरसावला आहे. त्याने कोरोनाशी लढण्यासाठी 1 कोटींचा मदतनिधी दिला आहे.
महेश बाबूने देखील नुकतीच टीएफआय कार्यकर्त्यांना कोरोना चॅरीटीसाठी मोठा निधी दिला आहे. यासोबतच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्यासाठी आणि घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आवाहन केले. यासोबतच महेश बाबूने अम्मा नन्ना अनंथा आश्रमा आणि चारूथमी चाइल्ड केअर सेंटरमध्ये किराणा सामान देण्याचाही निर्णय घेतला आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 58 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 2000 हून अधिक झाली आहे.