कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत. अभिनेत्री नरगिस फाखरीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती कसा टाईमपास करते आहे ते सांगितलं होतं. आता तिने आणखीन एक व्हिडिओ शेअर करत तिची समस्या सांगितली आहे.
नरगिस फाखरीने सांगितले की, घरात राहून तिला खूप बोर होत आहे. तिने हेदेखील सांगितलं की गेल्या तीन दिवसांपासून ती एकाच कपड्यात आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, तीन दिवसांपासून मी एकाच कपड्यात आहे. हाच तो पॉइंट आहे? काय परिधान करतो आहे आणि किती वेळ घालत आहोत. जर आपण याचा विचार नाही केला तर आपल्याकडे खूप पैसे वाचली. का करत आहोत हे आपण सगळे.
नरगिसला रॉकस्टार चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत झळकली होती.