कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरातील हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. या भयानक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसशी संबंधीत एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. वाराणसीमधील काशीच्या गल्ल्यांमध्ये स्त्री चित्रपटाच्या धर्तीवर 'ओ कोरोना कल आना'चे पोस्टर लावले जात आहे.
भितींवर लागलेले हे पोस्टर लोकांच्या आकर्षणाचा विषय बनले आहेत. वाराणसीतील भेलूपुर क्षेत्रातील खोजवा येथील गल्ल्यांमध्ये एक-दोन नाही तर डझनभर असे पोस्टर भिंतीवर पहायला मिळत आहेत. स्त्री चित्रपटातील एका सीनचा आधार घेत लिहिलंय की 'ओ कोरोना कल आना'. या पोस्टरच्या खाली पोस्टर छापणाऱ्या माणसाचे नावही लिहिले आहे.
पोस्टर छापणाऱ्या व्यक्तीने आज तकला सांगितले की, हा पोस्टर त्याने एका चित्रपटापासून प्रेरीत होऊन बनवला आहे. यामागे त्याचा हा हेतू आहे की लोकांनी जागरूक व्हावे आणि हा विचार करावा की, मी आज सुरक्षीत राहिन आणि कोरोनासारखा आजार दूर पळवण्यासाठी प्रयत्न करेन. त्यासाठी साफसफाई, सॅनिटायजर व मास्कचा वापर करेन.
या पोस्टरवाल्या व्यक्तीने हेदेखील सांगितलं की, हा पोस्टर स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांना जागरूक करण्यासाठी लावले आहेत. सर्व सुरक्षित राहोत आणि याबाबत कोणतीही अंधश्रद्धा पसरवू नये. हा पोस्टर संदेश देण्यासाठी लावला आहे.