कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी समोर आले असताना आता या सेलिब्रिटींच्या पत्नीही गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. होय, किंगखान शाहरूख खानची पत्नी गौरी खान यात आघाडीवर आहे. शाहरूखने मदत केलीच पण गौरीनेही तब्बल 95 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलीय.
लॉकडाऊनमुळे अनेक गरीब व रोजंदारी मजूरांची स्थिती गंभीर बनली आहे. कामधंदे ठप्प पडल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. या मजुरांच्या किमान दोनवेळच्या जेवणाची तरी सोय व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सोबत समाजातील काही मदतीचे हातही यासाठी पुढे आले आहेत. गौरी खान सध्या अशाच गरजुंसाठी काम करतेय. 95 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था तिने केली आहे. रोटी बँक फाऊंडेशन व मीर फाउंडेशनच्या सहकायाने ती मुंबईतील अनेक भागांमध्ये जेवण पूरवत आहे. तिने स्वत: ही माहिती दिली आहे.
शाहरूखनेही केलीही मोठी मदतअभिनेता शाहरूख खान आधीपासूनच मदतीसाठी पुढे सरसावला आहे. सीएम आणि पीएम फंडात त्याने आर्थिक मदत दिली. यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारला २५ हजार पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) कीट त्याने पुरविल्या. याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाहरूखचे आभार मानले होते. इतकेच नाही तर हजारो लोकांना जेवण, अॅसिड हल्ल्यातील पीडितांना किराणा मालाचीही मदत त्याने केली आहे.