Join us

चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध कुटुंबातील सगळे का राहातातेय वेगवेगळे, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 2:35 PM

या घरातील सगळेच गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे राहात आहेत.

ठळक मुद्देश्रुतीने सांगितले आहे की, आम्ही सगळेच विविध ठिकाणांहून नुकतेच आलो आहोत. त्यामुळे आम्ही एकांतात राहायचे ठरवले आहे आणि त्यातही एकत्र राहिल्यास कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्याचमुळे आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या घरात राहायचे ठरवले आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लोकांनी घरातून कमीत कमी बाहेर पडावे. गरज असेल तरच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा असे सरकार गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे. तसेच परदेशातून येणारे अनेक जण खबरदारी म्हणून एकांतात राहाणे पसंत करत आहेत. अभिनेता प्रभास परदेशातून आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कुटुंबापासून दूर राहात आहे आणि आता कमल हासन, त्यांची मुलगी श्रुती आणि अक्षरा आणि त्यांची पूर्वपत्नी सारीका हे वेगवेगळ्या घरात एकटे राहात आहेत.

श्रुती हासन लंडनमध्ये एका कामानिमित्त गेली होती. ती दहा दिवसांपूर्वीच परदेशातून परत आली असून तिचे संपूर्ण कुटुंब वेगवेगळे राहात आहे. कमल हासन, अक्षरा चेन्नईमधील त्यांच्या  वेगवेगळ्या घरात राहात असून सारीका मुंबईतील घरात राहात आहेत. ते सगळे वेगवेगळ्या घरात का राहात आहेत याविषयी श्रुतीनेच मुंबई मिररच्या प्रतिनिधीला सांगितले आहे. तिने तिच्या मुलाखतीत सांगितले आहे की, आम्ही सगळेच विविध ठिकाणांहून नुकतेच आलो आहोत. त्यामुळे आम्ही एकांतात राहायचे ठरवले आहे आणि त्यातही एकत्र राहिल्यास कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्याचमुळे आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या घरात राहायचे ठरवले आहे. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :कमल हासनश्रुती हसन