कोरोनामुळे अख्खे जग जागच्या जागी थांबलेय. देशातही परिस्थिती वेगळी नाही़ घरातून बाहेर पडू नका, स्वत:सोबत इतरांचा जीव वाचवा, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहेत. समाजाच्या भल्यासाठी किंबहुना कोरोनाचे संकट परतून लावण्यासाठी आपण सर्वांनी घरात राहणे आपले कर्तव्य आहे. पण सगळीकडे लॉकडाऊन असताना तळहातावर पोट असणा-यांचे मात्र हाल आहेत. दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्या घराचा गाडा चालतो, त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. आपल्या फिल्म इंडस्ट्रीतही असे अनेकजण आहेत.
इंडस्ट्रीतील अनेक वर्कर्स सध्या काम बंद असल्याने घरी बसून आहेत. प्रोड्सर्स गिल्ड, अनेक फिल्ममेकर्स या वर्कर्सची मदत करत आहेत. आता थलायवा रजनीकांत यांनी फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साऊथ इंडियाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्यानंतर आता रजनीकांत नदीगर संगम येथील कलाकारांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.