काय सांगता...? कोरोनाच्या विघ्नामुळे लांबले ‘या’ दोन बॉलिवूड कपलचे लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 11:30 AM2020-03-18T11:30:17+5:302020-03-18T11:32:05+5:30
जाणून घ्या कोण आहेत हे दोन कपल?
जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे सगळीकडे भीतीचे सावट आहे. एकीकडे कोरोना व्हायरसमुळे सिनेमा व मालिकांचे शूटींग रद्द झालेय. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडलेय. दुसरीकडे पर्सनल लाईफमधील इव्हेंटही लांबणीवर पडत आहेत. तामिळ अभिनेत्री उत्तरा उन्नीने कोरोना व्हायरसमुळे लग्न रद्द केले आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा व अली फजल यांचे नियोजित लग्नही लांबणीवर टाकण्यात आल्याचे कळतेय.
रिचा व अली फजल येत्या एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधणार होते. अर्थात दोघांकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता. पण आता कोरोनामुळे एप्रिलचा मुहूर्त अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिचा व अली कोर्ट मॅरेज करणार होते. यानंतर दिल्ली व मुंबई येथे त्यांच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार होते. पण कोरोनामुळे हे सगळे इव्हेंट लांबणीवर टाकण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. स्थिती नियंत्रणात आल्यानंतरच हे कपल लग्नाची तारीख निश्चित करणार आहे.
अर्थात अद्याप रिचा वा अली यांनी याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही.
वरूण व नताशाचे लग्नही लांबणीवर?
वरूण धवन व नताशा दलाल हे बॉलिवूड कपलही यावर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोरात होती . पण आता कोरोनाच्या विघ्नामुळे हे लग्नही पुढील वर्षीपर्यंत लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. खरे तर वरूण धवनचे डॅड डेव्हिड धवन यांना मुलाचे लॅव्हिश लग्न हवे आहे. सद्यस्थितीत ते शक्य नाही. आता यातून काही तोडगा निघतो का ते बघूच.