Join us

Coronavirus scare: कोरोना व्हायरसचा बॉलिवूड इंडस्ट्रीला असाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 11:04 AM

हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडलाही याचा फटका बसला आहे. एकीकडे अनेक मोठे कार्यक्रम पुढे ढकलले जात असताना चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही बदलली जात आहे. असे अनेक बदल या कोरोना व्हायसरमुळे दिसून येत आहेत. जाणून घेऊया काय काय बदल होत आहेत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये...

ठळक मुद्देसर्वसामान्यांसह आता त्याचा मोठा परिणाम सिने इंडस्ट्रीवरही होऊ लागला आहे.एकीकडे अनेक मोठे कार्यक्रम पुढे ढकलले जात असताना चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही बदलली जात आहे.चीनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसचा प्रभाव संपूर्ण जगात दिसून येत आहे.

-रवींद्र मोरेचीनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसचा प्रभाव संपूर्ण जगात दिसून येत आहे. सर्वसामान्यांसह आता त्याचा मोठा परिणाम सिने इंडस्ट्रीवरही होऊ लागला आहे. हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडलाही याचा फटका बसला आहे. एकीकडे अनेक मोठे कार्यक्रम पुढे ढकलले जात असताना चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही बदलली जात आहे. असे अनेक बदल या कोरोना व्हायसरमुळे दिसून येत आहेत. जाणून घेऊया काय काय बदल होत आहेत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये...* अक्षय कुमार आणि विन डीझल यांची होणार टक्कर

हॉलिवूडच्या फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरियस सीरिजचा नववा भाग अर्थात ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरियस 9’ हा चित्रपट २२ मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता कोरोनाव्हायरसच्या प्रभावामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २ एप्रिल २०२१ अशी करण्यात आली आहे. अशातच आता विन डीझल आणि जॉन सीना स्टारर चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या चित्रपटासोबत होणार आहे.* तरीही टळला नाही अक्षयचा सामना

यापूर्वी ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरियस 9’ या चित्रपटाचा सामना अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' आणि सलमान खानच्या 'राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटांसोबत रंगणार होता, मात्र आता चित्रपटाची रिलीज डेट बदलल्यामुळे ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरियस 9’ ची टक्कर अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' सोबत होणार आहे. ‘बेल बॉटम’ हा चित्रपट अगोदर २२ जानेवारी २०२१ रोजी निश्चित करण्यात आली होती, परंतु नंतर ती २ एप्रिल २०२१ करण्यात आली.* ‘सूर्यवंशी’ ची रिलीज डेट पुढे ढकलली

कोरोना व्हायरसमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेल्या चित्रपटांच्या यादीत फक्त हॉलिवूडपट ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरियस 9’ च नव्हे तर बॉलिवूडचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटदेखील समावेश आहे. अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन प्रदर्शनाची तारीख नंतर जाहीर करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित होणार होता. यापूर्वी जेम्स बाँड सीरिजचा ‘नो टाइम टू डाय’ची रिलीज डेटही बदलली गेली आहे.* चित्रपटगृहांवरही आले सावटकोरोनो व्हायरसचा संसर्ग चीन आणि भारत व्यतिरिक्त दक्षिण कोरिया आणि इटली पर्यंतही पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला साथीचा रोग जाहीर केला आहे. तेव्हापासून भारतातही सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरळ आणि दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश संबंधित राज्य सरकारने गुरुवारीच जारी केले.

टॅग्स :बॉलिवूडअक्षय कुमारकोरोना वायरस बातम्या