Join us

 सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह, बंगला सील तरीही रेखा का देत आहेत कोरोना टेस्ट करायला नकार?  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 12:59 PM

बीएमसीने रेखा यांना कोरोना चाचणीचा सल्ला दिला. पण अद्याप तरी रेखा यांनी कोरोना चाचणी केलेली नाही.

ठळक मुद्देरेखा यांचा सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळला. पाठोपाठ त्यांच्या बाजूच्या सोसायटीमध्येही चार कोरोनाचे रूग्ण सापडले. रे

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या  बंगल्यावरील सुरक्षारक्षक कोरोनाबाधित आल्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या परिसरातील अन्य चार बंगल्यांचे सुरक्षारक्षकांनाही बाधा झाली आहे. या सर्वांना मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. यानंतर बीएमसीने रेखा यांनाही कोरोना चाचणीचा सल्ला दिला. पण अद्याप तरी रेखा यांनी कोरोना चाचणी केलेली नाही. त्यांनी कोरोना टेस्ट करण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच काय तर  मुंबई महापालिकेतील कर्मचारी रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यासही नकार दिला. साहजिकच कोरोना टेस्ट करण्यास रेखा नकार का देत आहेत, असा प्रश्न सगळ्यांना पडला.

एबीपीबी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एमसीचे आरोग्य अधिकारी संजय फुंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. 

आरोग्य अधिका-याने सांगितले...रेखा यांचा सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळला. पाठोपाठ त्यांच्या बाजूच्या सोसायटीमध्येही चार कोरोनाचे रूग्ण सापडले. रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना झाल्याचे उघड झाल्यानंतर बीएमसीची एक टीम रेखा यांच्या बंगल्यावर पोहोचली. त्यांचा बंगला सॅनिटाइज केला गेला. यानंतर आरोग्य अधिकारी या नात्याने मी स्वत: रेखा यांना कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला देण्यासाठी गेलो. पण मला बंगल्यात साधा प्रवेशही दिला नाही. रेखा यांच्या मॅनेजर यांनी दरवाजा उघडला नाही. दरवाज्यामागूनच त्या माझ्याशी बोलल्या. त्यांनी रेखा भेटू शकणार नाही,असे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी मला रेखा यांचा मोबाईल नंबर दिला. त्या केवळ फोनवर बोलतील असे सांगितले. बंगल्याचा जो सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळला, त्याला बंगल्यात येण्याची परवानगी नव्हती. तो रेखा यांच्या एकदाही संपर्कात आला नाही, असे रेखा यांच्या मॅनेजरने सांगितले. शिवाय रेखा यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. त्यांना ताप नाही, अन्य काहीही अडचण नाही. अशी लक्षणे दिसल्यास त्या खात्रीने कोरोना टेस्ट करतील. मग आम्ही तुम्हाला कळवू, असे मॅनेजरने मला सांगितले. 

टॅग्स :रेखाकोरोना वायरस बातम्या