देशभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक मदतीचे हात पुढे येताना दिसत आहे. काही सेलिब्रेटीदेखील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. दरम्यान आता अभिनेते अनुपम खेरदेखील मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अनुपम खेर फाउंडेशनने डॉ आशुतोष तिवारी (ग्लोबल कैंसर फाउंडेशन, यूएसए) आणि बाबा कल्याणी (भारत फोर्ज, इंडिया) यांच्यासोबत मिळून नुकतीच ‘प्रोजेक्ट हील इंडिया’ नामक योजनेची सुरूवात केली आहे. याचा उद्देश्य, या कठीण काळात देशभरात कोविड-१९ च्या विरुद्धच्या सुरु असलेल्या लढाईत मदत करणे हा आहे.
या प्रकल्पांतर्गत, ही संस्था संपूर्ण भारतात गरजू संस्थांना आणि हॉस्पिटल्स ना महत्वपूर्ण उपकरणे आणि इतर लाइफ सपोर्टिंग साधने प्रदान करणार आहेत. क्रॉसवेंट वेंटिलेटर (आईसीयु क्रिटिकल केयर), मेडट्रोनिक वेंटिलेटर, रेसमेड नॉन-इनवेसिव वेंटिलेशन डिवाइस आणि ऑक्सीजन कंसंट्रेटर्सची पहिली तुकडी या आठवड्याभरात भारतात येण्याची आशा आहे.
हे सर्व काही माननीय बाबा कल्याणी आणि डॉ आशुतोष तिवारी यांच्यासारख्या मानवतावादी लोकांमुळे आहे जे जगाला उत्तम बनवण्यासाठी मदत करतात आणि मानवतेवरील आपला विश्वास अधिक ठाम बनवतात. त्यांच्यासोबत जोडले जाणे हा मी माझा स्वत:चा गौरव समजतो आणि याचा मला आनंद आहे.”