Join us

करीना, क्रिती आणि तबूचा बॉक्स ऑफिसवर जलवा; Crew सिनेमाने ३ दिवसांत पार केला ६० कोटींचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 14:53 IST

Crew Box Office Collection : करीना कपूरच्या Crew ने बॉक्स ऑफिसला पछाडलं; ३ दिवसांतच केली विक्रमी कमाई

करीना कपूर, तबू आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत असलेला Crew(क्रू) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. रिहा कपूरची निर्मिती आणि राजेश क्रिष्णनचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. करीना-तबू-क्रितीचं हे त्रिकुट प्रेक्षकांच्या भलतचं पसंतीस उतरलं आहे. Crew(क्रू) हा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे. 

Crew(क्रू) सिनेमाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवसापासूनच कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी या सिनेमाने ९.२५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी ९.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १०.५ कोटींची कमाई करत देशभरात अवघ्या तीनच दिवसांत २९.५ कोटींचा विक्रमी आकडा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गाठला आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात Crew(क्रू) सिनेमाचा जलवा पाहायला मिळत आहे. 

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. Crew(क्रू) सिनेमाच्या जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडेही समोर आले आहेत. या सिनेमाने ३ दिवसांत जगभरात तब्बल ६२.५३ कोटींचा गल्ला जमवला आहे. करीना कपूरने याबाबत खास पोस्ट शेअर केली आहे.  Crew(क्रू) सिनेमात करीना कपूर, तबू, क्रिती सेनॉन यांच्याबरोबरच कपिल शर्मा आणि दिलजीत दोसांझ हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :करिना कपूरतब्बूक्रिती सनॉन