Join us

Crew Cast Fees : 'क्रू'साठी करीनाने तब्बूपेक्षा घेतलं जास्त मानधन,पाहा स्टारकास्टची फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 18:20 IST

Crew Cast Fees: करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सनॉनचा चित्रपट क्रू नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या कॉमेडी ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सनॉनचा चित्रपट क्रू नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या कॉमेडी ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राजेश कृष्णन दिग्दर्शित या कॉमेडीपटात या तीन अभिनेत्रींचा अभिनय प्रेक्षकांना खूप भावतो आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर देखील दिसत आहे. दरम्यान आपण जाणून घेऊयात या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले.

तब्बूबॉलिवूडची सर्वात प्रतिभावान अभिनेत्री तब्बू गेल्या अनेक दशकांपासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. तब्बू अनेकदा चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारताना दिसली आहे. पण 'क्रू'मध्ये तिला मस्तमौला अंदाजात पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत. या चित्रपटासाठी अभिनेत्रीने ३-४ कोटी रुपये फी घेतली आहे.

करीना कपूर खानबॉलिवूडची बेबो करीना कपूरच्या नावाचा समावेश इंडस्ट्रीतील महागड्या अभिनेत्रींमध्ये होतो. बेबोने चित्रपटासाठी सर्वाधिक पैसे घेतले आहेत. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, करिनाने क्रूकडून १० कोटी रुपयांची मोठी रक्कम वसूल केली आहे. या चित्रपटात करिनाने एअर होस्टेस जास्मिन राणाची भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

क्रिती सनॉनकोणत्याही गॉडफादरशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या क्रिती सनॉन इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज क्रिती दिग्दर्शकांची पहिली पसंती बनली आहे. अभिनेत्रीने क्रूमध्ये एअर होस्टेस दिव्या राणाची भूमिका साकारली आहे, ज्यासाठी तिने ३-४ कोटी रुपये आकारले आहेत.

दिलजीत दोसांझपंजाबचा सुपरस्टार दिलजीत दोसांझनेही या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली आहे. फिल्मी बीटच्या वृत्तानुसार, दिलजीतने कमी कालावधीसाठी ३ कोटी रुपये आकारले आहेत. या चित्रपटात तो जयसिंग राठौरच्या भूमिकेत दिसत आहे.

कपिल शर्माप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचीही चित्रपटात छोटीशी भूमिका आहे. फिल्मी बीटनुसार, कपिलने या व्यक्तिरेखेसाठी ४०-५० लाख रुपये घेतले आहेत. या चित्रपटात तो तब्बूच्या पतीची भूमिका साकारत आहे.

टॅग्स :करिना कपूरक्रिती सनॉनतब्बूकपिल शर्मा दिलजीत दोसांझ