-रवींद्र मोरेभारतात क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ ची सध्या धामधूम सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा पराजय करुन नुकतेच भारताने पाकिस्तानालाही धूळ चाखवली. विशेष म्हणजे आतापर्यंत भारतीय क्रिकेट टीमने जेवढेही सामने खेळले आहेत त्या सर्वांमध्ये पाकवर मात केली आहे. क्रिकेटचे ग्राऊंडच नव्हे तर चित्रपटांच्या माध्यमातूनही भारतीय सेनाने पाकिस्तानला नेस्तनाबूद केले आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...* बॉर्डर
१९९७ मध्ये जेपी दत्ताने राजस्थान सिमेवर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित सत्य घटना ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर केली होती. ‘बॉर्डर’ मध्ये सर्वकाही बघायला मिळते जे एक देशभक्तिवर आधारित चित्रपटात अपेक्षित असते. यात १२० भारतीय सैनिकांनी संपूर्ण रात्र अत्याधुनिक पाकिस्तानी रणगाड्यांच्या मोठ्या रेजिमेंटला रोखून ठेवले होते आणि शेवटी त्यांना मागे हटावे लागले होते. या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, पुनित इस्सर, सुदेश बेरी सारख्या स्टार्सनी काम केले आहे.* एलओसी
२००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘एलओसी’ ची कथा १९९९ च्या भारत-पाक दरम्यान कारगिल युद्धावर आधारित होती. जेपी दत्ता दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटात अजय देवगन, अरमान कोहली, संजय दत्त, नागार्जुन, सैफ अली खान, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन, मोहनीश बहल, अक्षय खन्ना, मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रानी मुखर्जी, करीना कपूर, ईशा देओल आणि रवीना टंडन आदींनी मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचा पराक्रम आणि त्यांचे अदम्य साहस दाखविण्यात आले आहे.* लक्ष्य
या चित्रपटात ऋतिक रोशन, प्रीति जिंटा आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा एक वॉर-ड्रामा चित्रपट आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला होता. यात ऋतिक रोशनने कॅप्टन करण शेरगिलची भूमिका साकारली होती, तर प्रीतिने रेमिला दत्ताची भूमिका प्ले केली होती. या चित्रपटातही कारगिल युद्धाला दाखविण्या आले होते.* गाजी अटॅक
राणा दग्गुबाती, तापसी पन्नू, अतुल कुलकर्णी, केके मेनन यांचा हा चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट भारत-पाक दरम्यानच्या अशा युद्धावर आधारित आहे ज्याच्याबाबतीत लोकांना खूपच कमी माहिती आहे. ही कथा भारतीय नौसेनाच्या पहिल्या अंडरवाटर सबमरीन ऑपरेशनची आहे, ज्यात नौसेनाच्या आयएनएस राजपूत पानबुडीने पाकिस्तानची पानबुडी पीएनएस गाजीला नष्ट केले होते.* उरी: द सर्जिकल स्ट्राइक
'ये नया हिंदोस्तान है.. ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी...' हा संवादच ‘उरी..’ सिनेमा कसा आहे याची कल्पना देतो. विहान सिंग शेरगील (विकी कौशल) एक सळसळतं रक्त असणारा सैनिक, जो उरीवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा सूड घ्यायला तो उतावीळ असतो. आपल्या १९ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचं चित्तथरारक चित्रण उरी सिनेमात केलं आहे. कट्टर देशभक्ती आणि देशासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेल्या जवानांची ही कहाणी आहे.