बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री संयमी खेर मुख्य भूमिकेत आहे. एका हातामुळे अपंगत्व आलेल्या महिला क्रिकेटरची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे. संयमीने या चित्रपटात महिला क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. तर अभिषेक बच्चन क्रिकेटर प्रक्षिशकाच्या भूमिकेत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागने नुकताच ‘घूमर’ पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर सहवागने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
‘घूमर’ चित्रपट कसा आहे? याबाबत सेहवागने त्याच्या व्हिडिओतून भाष्य केलं आहे. “काल मी ‘घुमर’ चित्रपट पाहिला. मला हा चित्रपट खूप आवडला. बऱ्याच दिवसांनंतर क्रिकेटवर असलेला हा चित्रपट मी एन्जॉय केला. क्रिकेटवर असलेला हा भावनिक चित्रपट आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर क्रिकेटर्सच्या आयुष्यातील खडतर प्रवासाचा तुम्हाला अंदाज येईल. एखाद्या दुखापतीनंतर पुन्हा मैदानात उतरणं किती कठीण असतं, हे चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येईल. तसं तर मी स्पिनरचा आदर करत नाही. पण, संयमी खेरने टाकलेला ‘घूमर’ खरंच कौतुकास्पद आहे. ही व्यक्तिरेखा साकारणं अवघड होतं. पण, तिने भावनिक केलं,” असं म्हणत सेहवागने घूमरचं कौतुक केलं आहे.
‘इंडिया बेस्ट डान्सर’मध्ये मंगळागौरीचा खेळ, ‘बाईपण भारी देवा’ टीमचा कल्ला; सोनाली बेंद्रेही थिरकली
अभिषेक बच्चनचा अभिनय पाहून सेहवाग भारावला आहे. “तसं तर मी प्रशिक्षकाचंही ऐकत नाही. पण, अभिषेक बच्चनचा अभिनय बघून तुम्हाला त्याचं म्हणणं नक्कीच जाणून घ्यावसं वाटेल. १८ ऑगस्टला कुटुंबासह हा चित्रपट पाहा आणि प्रेरित व्हा. जसं अमिताभ बच्चन म्हणाले, तसंच मला हा खेळ आवडला. खूप सारे अश्रू घेऊन सिनेमा बघण्यासाठी जा. कारण हा चित्रपट तुम्हाला नक्कीच रडवेल,” असंही त्याने व्हिडिओत म्हटलं आहे.
“बॉडीगार्डचं डोकं फाटलं, माझ्या डोळ्याला...”, मानसी नाईकने सांगितला अपघाताचा धक्कादायक अनुभव
सेहवागचा हा व्हिडिओ बिग बींनीदेखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन शेअर केला आहे. “सेहवाग जी...एवढ्या सोप्या शब्दांत खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितली आहे,” असं कॅप्शन अमिताभ बच्चन यांनी या व्हिडिओला दिलं आहे.