cruise drugs case: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB)एका क्रुझवर छापा टाकला. या छाप्यामध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये दिल्लीतील काही प्रतिष्ठित उद्योजकांच्या मुलांसोबत अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान (aryan khan) असल्याचंही समोर आलं. त्यामुळे ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी आर्यनला अटक करण्यात आली आहे. आर्यनला अटक झाल्यानंतर कलाविश्वात एकाच चर्चेला उधाण आलं असून बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. यात काहींनी आर्यनवर टीका केली आहे. तर काहींनी त्याची पाठराखण केली आहे. अलिकडेच अभिनेत्री, दिग्दर्शिका पूजा भट्टने (pooja bhatt) आर्यनला पाठिंबा देणारं एक ट्विट केलं होतं. मात्र, या ट्विटमुळे तिच्याच अडचणीत वाढ झाली आहे. पूजाने केलेल्या ट्विटमुळे एनसीबीला या पार्टीची टीप देणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झालाचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच पूजाने आर्यनला पाठिंबा देणारं ट्विट केलं होतं. यावेळी 'मी किंग खानसोबत आहे', असं म्हणत तिने आर्यनसोबत सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. "सत्य परिस्थितीपेक्षा चित्र काहीतरी वेगळंच आहे", असं ट्विट तिने केलं होतं. तिच्या या ट्विटनंतर एका युजरने 'तिच्यामुळे एनसीबीला टीप देणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो', असं म्हटलं होतं.
पूजाने ट्विट करत दिला आर्यनला पाठिंबा
"..आणि आमच्याकडे अशी लोक आहेत जी जुन्या चित्रपटांमध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा रोल करण्यासही अपयशी ठरु शकतात. सत्य परिस्थिती ही प्रत्यक्षात दिसत असलेल्या गोष्टींपेक्षा खूप विचित्र आणि किचकट आहे. वेळ आलीये, जेव्हा बॉलिवूडला एक खलनायकाच्या रुपात दाखवण्यात येत आहे. म्हटलं तर हे सरकारी एजन्सीने नेमलेल्या आऊटसोर्सच्या प्रायव्हेट गुप्तहेराप्रमाणेच वाटत आहेत", असं ट्विट पूजाने केलं आहे. पूजाचं हे ट्विट पाहिल्यानंतर तिने सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात टाकल्याचा आरोप एका युजरने केला आहे. विशेष म्हणजे या युजरलाही तिने प्रत्युत्तर दिलं आहे.
पूजाने दिलं प्रत्युत्तर
पूजाच्या ट्विटवरुन ती सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीला एकप्रकारे एनसीबीला टीप देणारा व्यक्ती म्हणत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं एका नेटकऱ्याने म्हटलं होतं. त्यावर पूजाने प्रत्युत्तर दिलं आहे. "मी माझ्या पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. किंवा, टीप देणाऱ्यांनी सेल्फी घेण्यापासून आणि ते फोटो लीक करण्यापासून सावध राहिलं पाहिजे", असं उत्तर पूजाने दिलं.
पुढे ती म्हणते, "जर माझं ट्विट नीट लक्ष देऊन वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या डोळ्यांचा वापर केला असेल तर तुम्हाला समजेल की मी कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीने हा सुंदर सेल्फी घेतला आहे आणि तो लीक केलाय त्याला त्याला योग्य सल्ला द्या. कारण त्याची विवेक बुद्धी आणि धैर्य व्हायरल होतंय."
या व्यक्तींनी दिला शाहरुखला पाठिंबा
सलमान खान, दिग्दर्शक हंसल मेहता, सुनील शेट्टी, शेखर सुमन, हृतिक रोशन, सुझान खान, रविना टंडन.