Join us  

क्यूट मराठी अभिनेत्री मिथीला पालकरचा ग्लॅमरस प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2017 12:01 PM

गोड चेहरा, चेहऱ्यावर कायम स्मितहास्य, बोलणं गोड अशा वर्णनाच्या मुलीला पाहायला आणि बोलायला कुणाला आवडणार नाही? तुम्हाला माहितीये अशा वर्णनाची अभिनेत्री आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे. कोण माहितीये का? अहो..मिथिला पालकर. तीच जी अलीकडेच रिलीज झालेल्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटात अभिनेता अमेय वाघसोबत दिसली होती. केवढी छान दिसत होती नाही का त्यांची जोडी? पण तुम्हाला माहितीये का, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही एवढीच क्यूट आणि सुंदर दिसते. पाहूयात, या फोटोंच्या माध्यमातून तिच्या क्यूटनेसने भरलेला ग्लॅमरस प्रवास...

गोड चेहरा, चेहऱ्यावर कायम स्मितहास्य, बोलणं गोड अशा वर्णनाच्या मुलीला पाहायला आणि बोलायला कुणाला आवडणार नाही? तुम्हाला माहितीये अशा वर्णनाची अभिनेत्री आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे. कोण माहितीये का? अहो..मिथिला पालकर. तीच जी अलीकडेच रिलीज झालेल्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटात अभिनेता अमेय वाघसोबत दिसली होती. केवढी छान दिसत होती नाही का त्यांची जोडी? पण तुम्हाला माहितीये का, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही एवढीच क्यूट आणि सुंदर दिसते. पाहूयात, या फोटोंच्या माध्यमातून तिच्या क्यूटनेसने भरलेला ग्लॅमरस प्रवास...‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसीरिजमध्ये काम केलेल्या मिथीला पालकरने २०१४ मध्ये तिच्या करिअरला सुरूवात केली. या वेबसीरिजमुळेच तिच्या अभिनयाला एक आत्मविश्वास मिळाला. या फोटोतही फुलांनी भरलेली परडी घेऊन बसलेली मिथिला किती मोहक दिसते आहे...मिथिला पालकरचे रेखाटण्यात आलेले हे पेन्सिलचित्र. अशा सुंदर मुलीचे हे रेखाचित्र देखील केवढे सुंदर दिसते आहे? तिच्याकडे पाहतच रहावेसे वाटण्याइतपत ती नक्कीच क्यूट आहे, यात काही शंकाच नाही.‘माझा हनीमून’ या शॉर्ट फिल्मपासून तिने करिअरला सुरूवात केली. एवढेच नाही तर ही शॉर्टफिल्म मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील दाखवण्यात आली आहे. क्यूटनेसबरोबरच तिच्यामध्ये एक ग्लॅमरस अभिनेत्री देखील लपलेली आहे. या फोटोवरून तर नक्कीच तसे वाटते आहे नाही का?अभिनेत्री पडद्यावर ग्लॅमरस दिसत असल्या तरी घरी त्यांचा चेहरा हा वेगळाच असतो. आता हेच पाहा ना, मिथिलाकडे एक ‘पपी’ आहे. जो तिचा बेस्ट फ्रेंड आहे. त्याच्याशिवाय ती राहूच शकत नाही. पाहा ना आता या फोटोतही ती त्याला किती कवटाळून बसली आहे ते!नव्या दमाची आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून आपण मिथिला पालकर हिच्याकडे पाहतो. आता तर तिने ‘मुरांबा’ मध्ये काम केले आहे. येथून पुढे तिला अनेक असाइनमेंटस मिळतच राहणार यात काही शंका नाही. ती जर असेच ग्लॅमरस लुक्स देत राहिली तर बॉलिवूडच्याही काही टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव समाविष्ट व्हायला वेळ लागणार नाही.उत्तम फोटोग्राफीचा नमुना म्हणजे तिचा हा फोटो. कुरूळे मोकळे केस, काळ्या रंगाचा स्लिव्हलेस टॉप, अ‍ॅण्टिक इअररिंग्ज, ओठांना रेड कलरची लिपस्टिक मध्ये ती फारच क्यूट दिसते आहे.इंडस्ट्रीत काम करायचे म्हटल्यास हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस फोटोसेशन तर करायलाच हवे, नाही का? हा तिचा फोटो याच फोटोसेशनचा एक भाग म्हणावा लागेल. पांढऱ्या रंगाच्या साध्या कुर्त्यामध्ये तिने जो काही हा लूक दिला आहे, फारच अप्रतिम वाटतो आहे.चारचाकी गाडयांमध्ये फिरण्याची सवय आणि आवड असली तरीही दुचाकीवर फिरण्याचा आनंदच काही और असतो, नाही का? तसाच आनंद मिथिला देखील व्यक्त करत आहे. पाहा ना, तिच्या चेहऱ्यावर गाडी चालवत असल्याचा केवढा आनंद सामावला आहे.घरी असलेल्या लोखंडी कड्यांच्या झोक्यावर बसून मस्त झोका घेण्याचा आनंद तो निराळाच. पाहा ना, मिथीला मस्त या झोक्यावर बसून तेही हिरव्या रंगाच्या काठपदर साडीवर बसून झोक्याचा आनंद घेतेय.