Join us

Dabangg 3: सोनाक्षीने शेअर केलेला रज्जोचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:00 IST

सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. 'दंबग3' ची शूटिंग सुरु झाली आहे.

ठळक मुद्देप्रभु देवा हा सिनेमा दिग्दर्शित करतोयज्यात ती रज्जोच्या भूमिकेत दिसतेय

सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. 'दंबग3' ची शूटिंग सुरु झाली आहे. सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो समोर आले आहेत. तो पाहुन फॅन्स खूपच उत्साही झाले आहेत. या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हाची सिनेमातील लुकची एक झलक दिसते आहे.  

सोनाक्षी सिन्हाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ती रज्जोच्या भूमिकेत दिसतेय. या फोटोसोबत सोनाक्षीने एक कॅप्शन देखील लिहिले आहे, दबंगपासून दबंग3 मध्ये रज्जो परत आली आहे. तिने लिहिले आहे की आज सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस आहे.   

मध्यप्रदेशमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. याआधी सेटवरचे सलमानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभु देवा हा सिनेमा दिग्दर्शित करतोय.  ‘दबंग 3’ या चित्रपटात सलमानच्या अपोझिट  सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागली आहे. सोनाक्षीसोबतच महेश मांजरेकरची मुलगी अश्वनी मांजरेकर ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

चित्रपटातील उर्वरित कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. लवकरच सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भारत’ हातावेगळा केल्यावर सलमानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले. ‘दबंग 3’ पूर्ण होताच सलमान ‘इंशाअल्लाह’ या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात बिझी होणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासलमान खानदबंग 3