Join us

 ‘दबंग 3’च्या आयटम नंबरवरून सलमान-अरबाज कन्फ्युज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 15:50 IST

सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शूटींग सुरु झालेय. या चित्रपटात पुन्हा एकदा चुलबुल पांडे व रज्जो अर्थात सलमान खान व सोनाक्षी सिन्हाचा आॅनस्क्रीन रोमान्स रंगणार आहे. तूर्तास  ‘दबंग 3’च्या सेटवरून एक ताजी बातमी आलीय.

ठळक मुद्दे‘दबंग 3’ प्रभु देवा दिग्दर्शित करतोय. यापूर्वी सलमान व प्रभु देवा या जोडीने ‘वॉन्टेड’ या चित्रपटात सोबत काम केले होते.

सलमान खानच्यादबंग 3’चे शूटींग सुरु झालेय. या चित्रपटात पुन्हा एकदा चुलबुल पांडे व रज्जो अर्थात सलमान खान व सोनाक्षी सिन्हाचा आॅनस्क्रीन रोमान्स रंगणार आहे. तूर्तास  ‘दबंग 3’च्या सेटवरून एक ताजी बातमी आलीय. होय, सलमान आणि अरबाज खान हे दोन भाऊ सध्या जाम कन्फ्युज आहेत. एका गोष्टीवरून दोघांत मतभेद निर्माण झाले आहेत.

तुम्हाला ठाऊक आहेच की,  ‘दबंग’ सीरिजमधील आयटम नंबर कायम चर्चेत राहिले. मग ते ‘मुन्नी बदनाम’ असो वा ‘फेविकॉल’. या दोन्ही गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. ‘दबंग 3’ या चित्रपटातही एक आयटम नंबर असणार आहे. पण या आयटम नंबरमध्ये कुणाला घ्यावे, यावरून सलमान व अरबाज कन्फ्युज आहेत. अरबाज या स्पेशल गाण्यासाठी सनी लिओनीला कास्ट करू इच्छितो. दिग्दर्शक प्रभु देवा यालाही सनी लिओनी ही या गाण्यासाठी परफेक्ट असल्याचे वाटते. पण सलमान म्हणे, यात मौनी रॉयला घेऊ इच्छितो. ‘दबंग 3’च्या या गाण्यात करिना कपूरची वर्णी लागली, अशी बातमी मध्यंतरी होती. पण आता या नव्या बातमीने लोकही कन्फ्युज आहेत. अशात या गाण्यात कुण्या अभिनेत्रीची वर्णी लागते, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

‘दबंग 3’ प्रभु देवा दिग्दर्शित करतोय. यापूर्वी सलमान व प्रभु देवा या जोडीने ‘वॉन्टेड’ या चित्रपटात सोबत काम केले होते. आता १० वर्षांनंतर पुन्हा ही जोडी ‘दबंग 3’ हा चित्रपट घेऊन येतेय. साहजिकच चाहते प्रचंड उत्सुक आहेत. साऊथ अभिनेता सुदीप यात खलनायक साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :सलमान खानअरबाज खानदबंग 3