फातिमा सना शेखने आपल्या करियरची सुरूवात १९९७ साली इश्क चित्रपटातून केली होती. त्यानंतर चाची ४२०, बडे दिलवाले, वन टू का फोर, बिट्टो बॉस व आकाशवाणीमध्ये झळकली आहे. मात्र फातिमाला दंगल चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या दंगल चित्रपटात फातिमाने महिला पहेलवान गीता फोगटची भूमिका साकारली होती. ती काही महिन्यांपूर्वी आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये झळकली होती. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.
सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणाऱ्या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला याची आपल्याला जाणीव नसते.
आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी दंगल गर्ल फातिमा सना शेखलाही संघर्ष काही चुकलेला नाही. 'दंगल' सिनेमातून अभिनेत्री फातिमा सना शेखने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्याकडे काम नव्हते तेव्हा कुठेही जाण्यासाठी तिला पायी चालत जावे लागायचे. तसेच पैसे कमवण्यासाठी तिने फोटोग्राफीचेही काम केले होते. अभिनय क्षेत्रात येण्याआधी ती लग्न समारंभात जाऊन लोकांचे फोटो काढायचे. त्यातून तिची थोडी कमाई व्हायची. मात्र अभियक्षेत्रातील स्ट्रगलही तिने सुरूच ठेवला होता. आपले काम सांभाळत तिने अभिनय क्षेत्राकडे जास्त लक्ष दिले आणि त्यानंतर आपल्या मेहनतीने 'दंगल' सिनेमात काम करण्याची संधी मिळवली. मिळालेल्या संधीचे सोने करत फातिमानेही आपल्या भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली.
आज करिअरमध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत असताना फातिमा आपले स्ट्रगलही विसरलेली नाही. त्यामुळे संघर्षाचा काळच फातिमाला भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची नवी प्रेरणा आणि बळ देते असे फातिमा सांगयला विसरत नाही.