Join us

OMG!! दत्तक मुलीचा हात न धरल्याने ट्रोल झाली सनी लिओनी, संतापला पती डेनिअल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 11:32 IST

Sunny Keone Gets Trolled : अलीकडे सनी, तिचा पती डेनिअल वेबर  तिन्ही मुलांसोबत मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले आणि यानंतर काय तर, लोकांनी सनीला ट्रोल करणं सुरू केलं. 

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) तीन मुलांची आहे. यापैकी दोन मुलांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे तर मुलगी निशाला सनीने दत्तक घेतलं आहे. सनी तिच्या मुलांसोबतचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यांच्यासोबत अनेकदा ती फिरताना दिसते. अलीकडे सनी, तिचा पती डेनिअल वेबर  (Daniel Weber) तिन्ही मुलांसोबत मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले आणि यानंतर काय तर, लोकांनी सनीला ट्रोल करणं सुरू केलं. 

सनी जेव्हा केव्हा मुलांसोबत बाहेर पडते तेव्हा ती नेहमी तिच्या दोन्हीही मुलांचा हात धरते. पण दत्तक घेतलेल्या निशाचा हात ती कधीही धरताना दिसत नाही. त्यामुळे सनीने निशाला केवळ पब्लिसिटीसाठी दत्तक घेतलं आहे, असं म्हणत अनेक युजर्सनी सनीला ट्रोल करणं सुरू केलं. 

सनीच्या नवऱ्यानं दिलं ट्रोलर्सला उत्तरसनी सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर तिचा पती डेनिअल वेबर तिच्या बचावासाठी पुढे आला. बॉलिवूड लाईफ या वेबसाईटशी बोलताना त्यानं सनीचा बचाव केला. ‘हे सगळं बकवास आहे. हा निव्वळ मूर्खपणा आहे. मी मुळात याबद्दल बोलूच इच्छित नाही. आम्हाला अशा ट्रोलिंगमुळे काहीही फरक पडत नाही.  माझी दोन्हीही मुलं ही फक्त तीन वर्षांची आहे. जराही हात सोडला की ते रस्त्यावर धावतात.  माझी मुलगी निशा ही 6 वर्षांची आहे. मुलांच्या तुलनेत अधिक समजुतदार आहे. ती रस्त्यावर व्यवस्थित चालते.  निशा ही आमच्या घराची राजकुमारी आहे. लोकांनी असा विचार करणं मूर्खपणा आहे, असं डेनिअल म्हणाला. सनी लिओनी आणि तिचा पती डेनिअल वेबर यांनी लातूर येथील अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतलं आहे. सनी व डेनिअलने निशा दत्तक घेतलं, त्यावेळी फक्त 21 महिन्यांची होती. निशाला दत्तक घेतल्यानंतर 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून सनी ही दोन मुलांची आई झाली. त्यापैकी एकाचं नाव अ‍ॅशर आणि दुस-याचं नोआ आहे.  

टॅग्स :सनी लिओनी