डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग लवकरच करतोय बॉलिवूड डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 11:02 IST
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टारकिड्सची एन्ट्री होतेय. आता या यादीत बॉलिवूडचा आघाडीचा ‘खलनायक’ डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग याचेही नाव चढले आहे. होय, डॅनीचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय.
डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग लवकरच करतोय बॉलिवूड डेब्यू!!
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टारकिड्सची एन्ट्री होतेय. आता या यादीत बॉलिवूडचा आघाडीचा ‘खलनायक’ डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग याचेही नाव चढले आहे. होय, डॅनीचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय. एका इमोशनल अॅक्शन थ्रीलर चित्रपटातून रिंजिंग डेब्यू करणार आहे. पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार आहे.
‘स्कॉड’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात रिंजिंग जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. खुद्द डॅनी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबई मिररशी बोलताना या बातमीवर शिक्कामोर्तब केले. रिंजिंगला अखेर एक स्क्रिप्ट आवडलीय आणि यामुळे मी प्रचंड आनंदात आहे. आमचा मुलगा बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छितो, ही आमच्या कुटुंबासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी रिंजिंगला त्याच्या डेब्यूसाठी कुठल्याही प्रकारे मदत केलेली नाही. फिल्ममेकिंग एक खूप मोठी प्रक्रिया असते आणि कलाकार याचा छोटाचा भाग असतात. या सगळ्यांत रिंजिंग आपले स्थान निर्माण करेल, जे काही करेल, त्याला पूर्ण न्याय देईल, असा मला विश्वास आहे, असे डॅनी म्हणाले.मुलाच्या चित्रपटाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, हा एक थ्रीलर चित्रपट असेल. पण यात कॉमेडी आणि इमोशन्सही दिसतील . रिंजिंगने आपल्या पहिल्या चित्रपटासाठी तयारी सुरू केली आहे. सध्या तो डान्स आणि अॅक्शन अशा दोन्हींचे ट्रेनिंग घेतोय. एकंदर काय तर रिंजिंग एकदम सज्ज आहे. या नव्या स्टारकिडला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सूक आहात, ते नक्की कळवा.लवकरच रिंजिंगच्या या नव्या चित्रपटाची घोषणा होणार आहे. त्याच्या अपोझिट या चित्रपटात कुण्या अभिनेत्री वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काही दिवसांत तेही उघड होईल, तोपर्यंत अर्थातच प्रतीक्षा...