Join us  

Dasara OTT Release: फक्त सहा दिवसांत १०० कोटी कमावणारा ‘दसरा’ आता ओटीटीवर येतोय; वाचा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 3:18 PM

Dasara OTT Release: साऊथ सुपरस्टार नानीचा ‘दसरा’ हा सिनेमा चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त धुमाकूळ घातला. गेल्या ३० मार्चला रिलीज झालेल्या या सिनेमा अद्यापही चित्रपटगृहांतून उतरलेला नाही.

Dasara OTT Release: साऊथ सुपरस्टार नानीचा ‘दसरा’ हा सिनेमा चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त धुमाकूळ घातला. गेल्या ३० मार्चला रिलीज झालेल्या या सिनेमा अद्यापही चित्रपटगृहांतून उतरलेला नाही. अजय देवगणच्या भोला या सिनेमालाही या चित्रपटाने जोरदार टक्कर दिली. अवघ्या सहा दिवसांत १०० कोटींची कमाई करणारा हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होताेय.होय, नानीचा बहुचर्चित ‘दसरा’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर झळकणार आहे.  येत्या २७ एप्रिलला ‘दसरा’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रिम होणार आहे. अर्थात नेटफ्लिक्सवर तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे.

हिंदी व्हर्जन कधी होणार रिलीजओटीटीवर ‘दसरा’चं हिंदी व्हर्जन रिलीज होणार नाही. त्यामुळे चाहते काहीसे निराश आहेत. ओटीटीवर ‘दसरा’चं हिंदी व्हर्जन कधी रिलीज होणार, याबाबत तूर्तास कुठलीही अधिकृत माहिती नाही. अद्यापही ‘दसरा’चं हिंदी व्हर्जन चित्रपटगृहांत आहेे आणि बिझनेस करतोय. कदाचित त्यामुळे ‘दसरा’चं हिंदी व्हर्जन काही दिवसानंतर ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे.

६५ कोटी रूपयांत बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६ दिवसात १०० कोटीचा आकडा पार केला होता.  ‘दसरा’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १७ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ कोटींची कमाई करत अवघ्या दोन दिवसांत जगभरात ५३ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर केवळ सहा दिवसांतच दसरा चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.    

टॅग्स :Tollywoodनेटफ्लिक्स