Join us

दिवस असो की रात्र; स्टार्स का लावतात काळा चष्मा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 1:07 PM

बॉलिवूड सेलिब्रेटींची लाईफस्टाईल त्यांच्या चित्रपटासारखीच शानदार असते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स काहीही करण्यास तयार असतात. काही तर ...

बॉलिवूड सेलिब्रेटींची लाईफस्टाईल त्यांच्या चित्रपटासारखीच शानदार असते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स काहीही करण्यास तयार असतात. काही तर आपल्या आवडत्या स्टार्सला पाहण्यासाठी त्याच्या घरासमोर ताटकळत बसतात. आपल्या चाहत्यांबाबत अनेक गोष्टी त्यांच्या फॅन्सला माहिती असल्या तरी देखील ते काळा चष्मा का लावतात हे गुपित अनेकांना कळत नाही. बहुतांश वेळी मग तो दिवस असो किंवा रात्र त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या डोळ्यावर चष्मा चढलेलाच असतो. हे स्टार्स काळा चष्मा का लावतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रेस कॉन्फ्रेंस, पब्लिक इव्हेंट, एअरपोर्ट असो किंवा रात्री आयोजित केलेली पार्टी असो सेलिब्रेटींच्या डोळ्यावर काळा चष्मा चढलेलाच असतो. स्टार्स आपल्या डोळ्यावरचा चष्मा का काढत नाही यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे या स्टार्सना आपल्या डोळ्यांची फार काळजी घ्यायची असते. अनेकदा त्यांच्या चाहत्यांना ही आपल्या स्टार्सची स्टाईल आहे असेच वाटते. मात्र ही त्यांची स्टाईल नाही तर त्यांना असे करावेच लागते. काळा चष्मा लावणे स्टार्स बंधनकारक मानतात कारण कलावंत नेहमीच कॅमेºयाचा समोर असतात, कॅमेºयाचे फ्लॉश लाईट्सचा विपरित परिणाम त्यांच्या डोळ्यावर होण्याची भीती असते. यामुळेच बहुतेक स्टार्स चष्मा लावूनच बाहेर घराबाहेर पडतात. काळा चष्मा लावल्याने डोळ्यावर पडणाºया फ्लॅश लाईट्सची तिव्रता कमी होते. हे यामागील मुख्य कारण आहे. शिवाय डोळ्यावर चष्मा लावल्याने धूळ किंवा संसर्ग होण्यापासून बचाव करता येतो. बहुतेक स्टार्स आऊटडोर शूटिंग करताना केवळ शूटिंगपुरताच चष्मा काढून ठेवतात. कारण सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम शूटिंगवर पडू शकतो. याचमुळे जेव्हा केव्हा स्टार्स सार्वजनिक ठिकाणी येतात तेव्हा तेव्हा ते आपल्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी काळा चष्मा लावणे पसंत करतात. दुसरे म्हणजे हे स्टार्स काळा चष्मा लावल्यावर स्टायलीश दिसतात, म्हणूनही काळा चष्मा लावला जातो. शिवाय चेहºयावर हसू ठेऊन आपले दु:खही त्यांना लपविता येते.