Join us

मी नाही पाहिले, कोणाकडून तसे ऐकले होते...! सीबीआयसमोर रिया चक्रवर्तीच्या शेजारी महिलेचा युटर्न

By रूपाली मुधोळकर | Published: October 12, 2020 10:25 AM

13 जून रोजी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांतसोबत बघितल्याचा दावा रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थवानीने केला होता.

ठळक मुद्देया यूटर्ननंतर सीबीआयने डिंपलला कडक शब्दांत इशारा दिल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आत्तापर्यंत एक ना अनेक खुलासे झालेत. यापैकीच एका खुलाशाने सर्वांना धक्का बसला होता. होय, सुशांत व रिया 13 जूनला एकत्र पाहिले होते, असा खुलासा रिया चक्रवर्तीची शेजारीण डिंपल थवानी हिने केला होता. तिच्या या दाव्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. कारण  8 जूननंतर मी कधीच सुशांतला भेटले नाही, असा दावा रियाने याआधी केला होता. मात्र सीबीआयसमोर डिंपलचा हा दावा फार काळ टिकला नाही. आता तिने स्वत:चा जबाब बदलला आहे.  

सुशांत 14 जूनला गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याआधी 13 जूनला सुशांतने रियाला घरी ड्रॉप करताना आपण पाहिले होते, असा दावा डिंपलने एका टीव्ही चॅनलसमक्ष केला होता. तिच्या याच  दाव्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सीबीआयने डिंपलची चौकशी केली. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी एक दिवस सुशांत आणि रियाला एकत्र पाहिले का? असा सवाल जेव्हा सीबीआयने डिंपलला विचारला तेव्हा ती बदलली. मी स्वत: रिया व सुशांतला एकत्र पाहिले नाही. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी तो आणि रिया भेटले होते, असे मी कोणाकडून तरी ऐकले होते, असा जबाब तिने दिला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत रियाला ड्रॉप करायला आला आहे हे तुम्ही बघितले होते का? असा सवाल सीबीआयने डिंपलला केला. यावर  नाही. मी नाही कोणीतरी दुस-याने पाहिले होते, असे उत्तर डिंपलने दिले.दुस-या कोणीतरी? म्हणजे नक्की कोणी पाहिले होते? मग ती व्यक्ती समोर का येत नाही? या प्रश्नावर, ते मला माहित नाही, असे उत्तर डिंपलने दिले. त्या व्यक्तीने सुशांत आणि रियाला एकत्र केव्हा पाहिले होते? यावरही मला माहित नाही, असे ती म्हणाली.

सीबीआयने  दिली सक्त ताकीद  या यूटर्ननंतर सीबीआयने डिंपलला कडक शब्दांत इशारा दिल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.  यापुढे तुला स्वत:ला जे माहित असेल तेच बोलत जा. जे तू पाहिलेले नाहीस त्या गोष्टी पसरवू नकोस, अशा शब्दांत सीबीआयने डिंपलला तंबी दिली. सुशांतने 14 जून 2020 रोजी राहत्या घरामध्ये आत्महत्या केली होती. गेले 4 महिने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. काही दिवसांपूर्वी या तपासामध्ये ड्रग कनेक्शनही समोर आले होते. यामध्ये बड्या अभिनेत्री आणि ड्रग पेडलर्सचीही चौकशी करण्यात आली होती.

अनेकदा आत्महत्येचे विचार आलेत, माझ्या लेकीने खूप काही सोसले...! पहिल्यांदा बोलली रिया चक्रवर्तीची आई

आता अँकर्स माफी मागणार का? रिया चक्रवर्तीला जामीन मिळताच असे रिअ‍ॅक्ट झालेत बॉलिवूडकर

राजकीय साठमारीत भरडली गेली एक हसीना

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत