लग्नाच्या एक दिवसांपूर्वी काज अग्रवालने शेअर केला होता फोटो, कॅप्शनने वेधले सा-यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 08:00 PM2020-10-31T20:00:00+5:302020-10-31T20:00:00+5:30

काजलने गाजावाज न करताच गौतमसोबत गुपचूप साखर पुडा उरकला होता.

A day before the wedding, Kaj Agarwal shared a photo, the caption caught Attention | लग्नाच्या एक दिवसांपूर्वी काज अग्रवालने शेअर केला होता फोटो, कॅप्शनने वेधले सा-यांचे लक्ष

लग्नाच्या एक दिवसांपूर्वी काज अग्रवालने शेअर केला होता फोटो, कॅप्शनने वेधले सा-यांचे लक्ष

googlenewsNext

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल बिझनेसमन गौतम किचलूसोबत विवाहबंधनात अडकली आहे. गौतम एक बिझनेसमॅन आहे. पेशाने इंटिरिअर डिझाईनर आहे. बोहल्यावर चढण्यापूर्वी काजलने एक फोटो शेअर केला होता. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते.

लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांची होणा-या नवरीच्या मनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था काजल अग्रवालची झाली होती. त्यामुळेच तिने आपली भावना मनात न ठेवता सोशल मीडियावर फोटो शेअर करत व्यक्त केली होती.

ब्लॅक अँड व्हाइट फोटोत काजल नववधूच्या रुपात तयार होताना दिसतेय. तिच्या हातात लग्नाचा चुडा असून तिच्या मागे लहेंगा दिसतोय. या फोटोला तिने कॅप्शन दिले - वादळापूर्वीची शांतता.

लग्नापूर्वी काजल अग्रवाल माध्यमांसमोर आली होती. काजलसोबत तिची आई विनय या देखील होत्या. काजल यावेळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिच्या हातावर मेहंदी दिसली, शिवाय लग्नाचा चुडादेखील तिने घातला होता. त्यावर रुमाल बांधला होता.

रिपोर्टनुसार, काजल ब-याच दिवसांपासून गौतमला डेट करत होती. मात्र याविषयी तिने कधीच  जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. काजलने गाजावाज न करताच  गौतमसोबत गुपचूप साखर पुडा उरकला होता. 

काजल साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपची अभिनेत्री आहे

सध्या 'मोसागल्लू','आचार्य', 'मुंबई सागा', 'हे सिमिनिका' असे सिनेमे काजल कडे आहेत. लवकरच तिचे हे सिनेमेही रसिकांच्या भेटीला येणार आहेत. काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

 

यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून.साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.

Web Title: A day before the wedding, Kaj Agarwal shared a photo, the caption caught Attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.